महाराष्ट्र

maharashtra

Jammu & Kashmir: जम्मु काश्मिरमध्ये 300 दहशतवादी सक्रीय -लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

By

Published : Nov 22, 2022, 10:53 PM IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) सुमारे 300 दहशतवादी (Terrorists) सक्रिय आहेत. लष्कराच्या (Indian Army) उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी ही माहिती दिली. जम्मू आणि काश्मीरच्या पाकव्याप्त (POK) भागात सुमारे 160 दहशतवादी सीमा ओलांडून भारतात येण्यासाठी विविध लॉन्च पॅडवर थांबले आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.

Jammu & Kashmir
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

श्रीनगर :भारतीय लष्कराच्या (Indian Army) उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी मंगळवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 300 दहशतवादी सक्रिय आहेत. यातील 82 विदेशी आणि 53 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जवळपास 170 अज्ञात दहशतवादी (Terrorists) आहेत, ज्यांना गुन्हेगारी कारवाया करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. लष्करासाठी ही चिंतेची बाब आहे.

लेफ्टनंट जनरल द्विवेदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासंदर्भात दहशतवाद्यांचे सर्व मनसुबे उधळून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीरच्या पाकव्याप्त भागात सुमारे 160 दहशतवादी सीमा ओलांडून भारतात येण्यासाठी वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर थांबले आहेत, असा खुलासाही त्यांनी केला. ते म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतर, त्यानंतर तेथे सुरक्षेच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. कारण शांतता आणि विकास हे सर्वांचे प्राधान्य बनले आहे.

पाकिस्तान पुरवतोय दहशतवाद्यांना शस्त्र ?जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेजारील देश आता पिस्तूल, ग्रेनेड आणि ड्रग्ज यांसारख्या छोट्या शस्त्रास्त्रांची खेप पाठवत आहे. द्विवेदी पुढे म्हणाले, या छोट्या शस्त्रांचा वापर जम्मू-काश्मीरचे नसलेल्या रहिवाशांना लक्ष्य करण्यासाठी केला जातो, जे येथे उदरनिर्वाहासाठी येतात. स्थानिक नागरिक, सुरक्षा दल (Indian Army) आणि पोलिसांनी अशा कृत्यांचा निषेध केला आहे. निरपराधांच्या हत्येमध्ये सामील असलेल्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.असं द्विवेदी म्हणाले.

सीमेच्या या बाजूने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पाठवले जात असून गेल्या वर्षी जूनमध्ये खोऱ्यातील बारामुल्ला जिल्ह्यात 47 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते, असेही लष्कराच्या कमांडरने सांगितले. पूर्ण शस्त्रे आणि ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. स्थानिक तरुणांना अतिरेकी संघटनांमध्ये (Terrorist Unions) भरती करण्याबाबत, ते म्हणाले की योग्य संगोपन सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details