महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2022: श्रीगणेश विसर्जनाचे आज आहेत 4 मुहूर्त, जाणून घ्या विसर्जनाची सोपी पद्धत

By

Published : Sep 9, 2022, 10:02 AM IST

10 दिवस गणेशाची पूजा केल्यानंतर आज श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन ( Ganpati Visarjan Shubh Muhurat 2022 ) होणार आहे. आज गणपती विसर्जनाचे चार मुहूर्त ( Ganpati Visarjan Muhurat ) आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या वेळेला गणपतीचे विसर्जन करू शकता.

Ganpati Visarjan Shubh Muhurat 2022
श्रीगणेश विसर्जन

आज गणपती आहे विसर्जन.( Ganpati Visarjan Shubh Muhurat 2022 ) तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या वेळेला गणपतीचे विसर्जन करू शकता. परंतु हे काम सूर्यास्तापूर्वी करावे हे लक्षात ठेवा. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.

विसर्जनानंतर एक रोप लावा - वृक्षारोपण करण्याचे वराहमिहिराने ग्रंथांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी काही विशेष नक्षत्रांचा उल्लेख केला आहे. त्यापैकी दोन नक्षत्रे 9 सप्टेंबर रोजी राहतील. त्यामुळे गणपती विसर्जनानंतर ( Ganpati Visarjan ) तुळस, कडुलिंब, अशोक, आवळा किंवा कोणतेही पूजनीय झाड विसर्जन मातीमध्ये लावावे.

पाण्यात विसर्जन का केले जाते - पाणी हे पाच तत्वांपैकी एक आहे. त्यात विरघळल्याने, प्राण प्रतिष्ठत मूर्ती तिच्या मूळ तत्वात विलीन होते. पाण्याच्या माध्यमातून श्रीगणेशाचे साकार रूप निराकार होते. हे परमात्मा एकाकार होण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे पाण्यात विसर्जनाचे महत्त्व आहे.

म्हणून सुरू झाली मूर्ती विसर्जनाची परंपरा -यासंबंधीच्या एका आख्यायिकेनुसार महर्षी वेदव्यास महाभारत लिहिण्यासाठी चांगल्या लेखकाच्या शोधात होते. तेव्हा श्रीगणेशांनी यासाठी होकार दिला. पण त्यांनी एक अटही घातली की, जोपर्यंत महर्षी न थांबता बोलत राहतील तोपर्यंत ते लिहीत राहतील. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून वेद व्यासांनी महाभारताचे पठण सुरू केले. श्रीगणेश सलग 10 दिवस कथा लिहीत राहिले. कथा पूर्ण होईपर्यंत सतत लिहिल्याने श्रीगणेशाच्या शरीराचे तापमान वाढले होते. महर्षी वेदव्यासांनी त्यांना सरोवरात स्नान घातले. तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता. त्यामुळे मूर्ती विसर्जनाची परंपरा सुरू झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details