महाराष्ट्र

maharashtra

Free Smartphone scheme : राजस्थानची जनता होणार स्मार्ट; आजपासून सुरू होणार स्मार्टफोन योजना

By

Published : Aug 10, 2023, 2:53 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील बुधवारी मानगढ येथे या योजनेची सुरुवात केली होती. तेथील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊन राहुल गांधी यांनी योजनेचा शुभारंभ केला केला होता. आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जयपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ करतील.

स्मार्टफोन योजना
स्मार्टफोन योजना

जयपूर :आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जयपूरमधील बिडला सभागार येथे 'स्मार्टफोन योजने'चा शुभारंभ करतील. या योजनेंतर्गत 40 लाख महिलांना आणि विद्यार्थ्यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. याचबरोबर 'डिजिटल सखी बुक' योजनादेखील आज लॉन्च केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या फेरीत 'चिरंजीवी योजना' लाभार्थी असलेल्या कुटुंबामधील महिलांना स्मार्टफोन दिले जातील. दरम्यान याआधी राहुल गांधींनी या योजनेची सुरुवात मानगढ येथे विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊन केली होती.

कोणाला मिळेल स्मार्टफोन : राजस्थान सरकारकडून मोबाईल आणि सिमसाठी पैसे दिले जाणार आहेत. स्मार्टफोन आणि सिमसाठी 6 हजार 800 रुपये थेट लाभार्थ्यांच्या ई-वॉलेटमध्ये जमा केले जाणार आहेत. यासह सरकारी शाळेत 9 वी ते 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्मार्टफोन मिळणार आहेत. उच्च शिक्षणसंस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विधवा/ एकल नारी पेन्शन योजनेतील लाभार्थी महिला, 2022-23 या वर्षात मनरेगा योजनेंतर्गत 100 दिवस काम केलेल्या कुटुंबातील महिला तसेच 2022-23 या वर्षात इंदिरा गांधी शहरी रोजगार गारंटी योजनेत 50 दिवस काम केलेल्या महिलांना स्मार्टफोन मिळणार आहेत.

मोफत मिळेल मोबाईल आणि सिम : स्मार्टफोन योजनेसाठी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शिबिरात तारखेनुसार बोलवले जाईल. शिबिरात बोलावण्यासाठी प्रशासन त्यांना एसएमएसद्वारे आमंत्रण देईल. तसेच एक पावती देण्यात येईल. यात शिबिराची तारीख, शिबिराचे ठिकाण आणि कोणती कागदपत्रे सोबत आणायची आहेत, याची माहिती असेल. तसेच लाभार्थ्यांना शिबिरात आपल्यासोबत एक स्मार्टफोन न्यावा लागेल. त्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर नवीन मोबाईल फोन लाभार्थ्यांना मिळेल.

प्रक्रिया अशी असेल : शिबिरातील आयजीएसवाय पोर्टलवर लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाईल.पोर्टलवर जन आधार क्रमांक टाकून सत्यता तपासली जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनमध्ये जन आधार ई-वॉलेट डाऊनलोड करुन दिले जाईल. त्यानंतर तीन प्रकारचे फॉर्म लाभार्थ्यांना दिले जातील. लाभार्थ्यांना ते फॉर्म मोबाईल कंपनीच्या शोरुममध्ये घेऊन जावे लागेल. त्यानंतर त्यांना मोबाईल आणि सिम मिळेल, अशी माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विभागाचे उपसंचालक रितेश कुमार शर्मा यांनी दिली. दरम्यान लाभार्थ्यांना शिबिरात मिळालेला फॉर्म मोबाईल शोरुममध्ये स्कॅन केला जाईल. आयजीएसवाय या पोर्टलवर या फॉर्मची नोंद होईल आणि त्यात ते अपलोड केले जातील. ही प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांच्या ई-वॉलेटमध्ये सरकार 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर करेल. लाभार्थ्यांच्या ई-वॉलेटमध्ये 6 हजार 125 रुपये मोबाईल फोन घेण्यासाठी मिळतील. तर 675 रुपये सिमकार्ड आणि इंटरनेट डेटा प्लानसाठी मिळतील. यानंतर एप्रिल 2024 आणि एप्रिल 2025 मध्येही इंटरनेटसाठी 900 रुपये पाठवले जातील.

हे लागतील कागदपत्रे:

  1. जनाधार कार्ड
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. जनाधार कार्डमध्ये जो मोबाईल देण्यात आला आहे तो मोबाईल फोन
  5. विद्यार्थी असतील त्यांचे ओळखपत्र
  6. विधवा महिलांचे पीपीओ नंबर

हेही वाचा-

  1. Modi Visit Rajasthan: गांधींच्या देशाचे नेतृत्व करत असल्यामुळे मोदींना जागतिक सन्मान -गेहलोत
  2. Congress to decide Rajasthan CM: राजस्थानात अशोक गेहलोत यांचा पत्ता होणार कट.. कोण होणार नवीन मुख्यमंत्री..?

ABOUT THE AUTHOR

...view details