महाराष्ट्र

maharashtra

बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 1:00 PM IST

Firing In Lakhisarai : लखीसराय येथे एकाच कुटुंबातील सहा जणांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले, तर तिघांचा मृत्यू झालाय. यामुळं एकच खळबळ उडालीय.

Firing In Lakhisarai
Firing In Lakhisarai

लखीसराय Firing In Lakhisarai : बिहारमधील लखीसराय इथं आज सकाळी एकीकडे लोक श्रद्धेचा मोठा सण छठचा दुसरा अर्घ्य देण्यात व्यग्र असताना दुसरीकडं शहरातील पंजाबी वस्तीत एका तरुणानं रक्तरंजित घटनेचा कट रचला होता. प्रत्यक्षात छठ घाटावरुन घरी परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर एका तरुणानं अंदाधुंद गोळीबार केलाय. यात तिघांचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

एकाच कुटुंबातील सहा जणांवर झाडल्या गोळ्या : हे संपूर्ण प्रकरण एकतर्फी असल्याचं बोललं जातय. मिळालेल्या माहितीनुसार, लखीसरायच्या पंजाबी वस्तीत एका प्रियकरानं प्रेयसीसह कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांनाही उपचारासाठी राजधानीतील पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आलं होतं, मात्र पाटण्याला उपचारासाठी नेत असताना त्याच्या प्रेयसीचाही मृत्यू झालाय.

तरुणाला तरुणीशी करायचं होतं लग्न : कुटुंबातील एका सदस्यानं सांगितलं की, तरुणी अनेकदा फोनवर एका तरुणाशी बोलायची. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. परंतु, मुलीनं त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. मात्र तो अनेकदा लग्नाबाबत बोलत राहिला. घरच्यांनी त्याला नकार दिला पण त्यानं ऐकलं नाही. मात्र, हा मुलगा असा प्रकार करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

"पंजाबी वस्तीत छठ पूजा अर्घ्य दिल्यानंतर आशिष चौधरी नावाच्या तरुणानं एकाच कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडल्या. यात 4-5 जण जखमी झाले. 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आरोपी तरुणाचं मृत कुटुंबातील मुलीवर प्रेम होतं. त्या तरुणाला त्या मुलीशी लग्न करायचं होतं पण कुटुंब तयार नव्हतं."- पंकज कुमार, एसपी, लखीसराय

तीन जण पोलिसांच्या ताब्यात : पोलीस कॅप्टन पंकज कुमार यांनी सांगितलं की, हल्ला करुन प्रियकर फरार झालाय. तर त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. यात त्याच्या प्रेयसीसह तिघांचा मृत्यू झालाय. तर तीन जणांवर पाटण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

हेही वाचा :

  1. जयपूरमध्ये एका तरुणानं केली पत्नी आणि दोन मुलींची हातोड्यानं वार करुन हत्या
  2. Woman Body Found: वडगाव शिवारातील शेतात आढळला गळा चिरलेला महिलेचा मृतदेह
  3. Paratwada Murder Case: शेतमजूर महिलेवर 'त्याची' वाईट नजर; शेतमजूर दाम्पत्याने 'त्याला' कायमचचं संपविलं

ABOUT THE AUTHOR

...view details