महाराष्ट्र

maharashtra

Rajya Sabha Elections: अर्थमंत्री निर्मला सीतारामन कर्नाटकमधून पुन्हा राज्यसभेवर जाणार?

By

Published : May 15, 2022, 11:08 AM IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकमधून पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शनिवारी बेंगळुरू येथे होणार्‍या भाजप कोअर कमिटीची बैठक उमेदवारांना अंतिम स्वरूप देईल आणि पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे मंजुरीसाठी पाठवेल. ( Rajya Sabha Elections ) कर्नाटकातील चार राज्यसभेच्या जागांपैकी १२० आमदारांसह भाजपचे दोन राज्यसभेचे सदस्य निवडून येऊ शकतात.

बेंगळुरू - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकमधून पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ( Finance Minister Nirmala Sitharaman ) शनिवारी बेंगळुरू येथे होणार्‍या भाजप कोअर कमिटीची बैठक उमेदवारांना अंतिम स्वरूप देईल आणि पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे मंजुरीसाठी पाठवेल. कर्नाटकातील चार राज्यसभेच्या जागांपैकी १२० आमदारांसह भाजपचे दोन राज्यसभेचे सदस्य निवडून येऊ शकतात.


सीतारामन यांची (2016)मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती आणि त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, केंद्रीय मंत्री असलेल्या सदस्याची निवड करणे कर्नाटकसाठी ही बाब प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना दुसऱ्यांदा वरिष्ठ सभागृहात पाठवण्यास उत्सुक आहेत. अस ते म्हणाले आहेत. "आम्हाला खात्री आहे, की केंद्रीय नेते सीतारामन यांना होकार देतील. तसेच, अशी खात्री आम्हाला इतर उमेदवाराबद्दल नाही असही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई( Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी सांगितले की, शनिवारी होणाऱ्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावर चर्चा झाली. अरुण शहापूर (उत्तर-पश्चिम शिक्षक), हनुमंत रुद्रप्पा निरानी (उत्तर-पश्चिम पदवीधर) आणि एमव्ही रविशंकर (दक्षिण पदवीधर) या परिषदेसाठी त्यांनी आधीच तीन उमेदवारांची घोषणा केली असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस एन रविकुमार यांनी सांगितले. पश्चिम शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाचे तिकीट परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांना मिळू शकते, जे नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुका 3 जून रोजी होत आहेत. तर, दोन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे 10 आणि 13 जून रोजी मतदान होत आहे. 10 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका आहेत. बोम्मई म्हणाले, की त्यांनी गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्याशी झालेल्या बैठकीत इतर मुद्द्यांवर आधीच चर्चा केली आहे. "परिषद आणि राज्यसभा निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर कोअर कमिटीमध्ये तपशीलवार चर्चा केली जाईल, असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -Murder by Naxals : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून इसमाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details