महाराष्ट्र

maharashtra

Son died by fathers car : वडिलांच्याच कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू

By

Published : Nov 25, 2021, 7:00 PM IST

Updated : Nov 25, 2021, 7:34 PM IST

Father accidentally crushed son
कार गेली मुलाच्या अंगावरून

हैदराबादमधील एलबी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका बापाने नकळतपणे आपल्या लेकाच्या अंगावर कार चढवली आहे.(Father accidentally crushed son by car) गाडीखाली चिरडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. (Son died by fathers car). या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हैदराबाद -एलबी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका बापाने नकळतपणे आपल्या मुलाच्या अंगावर कार चढवली (Father accidentally crushed son by car) गाडीखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे (Son died by fathers car). या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ( Hyderabad accident video ) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ

...आणि चिमुकल्याला कारने चिरडले -

हैदराबादमधील मन्सूराबाद जवळील एलबी नगर येथे ही दुःखद घटना घडली. वडील कार धुवून अपार्टमेटमध्ये लागत असताना ही घटना घडली. वडिल आपल्या मोठ्या मुलासोबत गाडीत बसले होते. दरम्यान त्यांच्या पाठोपाठ आलेल्या चिमुकल्यांला त्यांनी पाहिलेच नाही. तो गाडीच्या आजूबाजूला खेळू लागला. यावेळी तो कारच्यासमोर आला आणि अपघात झाला. त्यानंतर कार मागे घेत असताना कार त्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली असावी, असे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या सर्व अपघाताला थोडासा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.

वडील करतात कार चालकाचे काम -

मुलाचे वडील लक्ष्मण हे संगारेड्डी जिल्ह्यातील झहीराबादचे रहिवासी होते. पाच वर्षांपूर्वी त्याचा राणीशी विवाह झाला होता. त्यांना एक बाळ आणि एक वर्षाचा मुलगाही आहे. लक्ष्मण हे वर्षभरापूर्वी नोकरीनिमित्त कुटुंबासह शहरात स्थलांतरित झाले. लक्ष्मण हा कार चालक म्हणून काम करतो तर त्याची पत्नी मन्सूराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करते.

हेही वाचा -पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात झाल्याने घटना उघडकीस

Last Updated :Nov 25, 2021, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details