महाराष्ट्र

maharashtra

फरीदाबादमध्ये भिक्षेकरूकडे मिळाली तब्बल 50 लाखांची रोकड, पोलिसांच्या ताब्यात

By

Published : May 12, 2022, 5:33 PM IST

रोकड
रोकड ()

फरीदाबाद पोलिसांनी बुधवारी (दि. 11 मे) एका भिक्षेकरूला अटक केली आहे. ( Faridabad police arrested beggar ) त्याच्या जवळ असलेल्या गाठोड्यात पोलिसांना 50 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे.

फरीदाबाद ( हरियाणा ) - बुधवारी (दि. 11 मे) फरीदाबाद पोलीस ठाणे प्रभारी बलवान सिंह हे आपल्या पथकासोबत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका प्लास्टिकचे गाठोडे घेतलेला भिक्षेकरू दिसला ( Faridabad police arrested beggar ). पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करत त्या गाठोड्याची तपासणी केली असतात त्यात तब्बल 50 लाखांची रोकड आढळून आली.

गस्तीच्यावेळी भिक्षेकरू प्लास्टिकचे गाठोडे घेऊन संशयितरित्या फिरत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने भिक्षेकरुची विचारपूस केली असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी गाठोड्यात काय आहे, असा सवाल केला. मात्र, त्याने त्यावेळीही उत्तर दिले नाही. त्यामुळे ते गाठोडे उघडून दाखवण्यास पोलिसांनी भिक्षेकरुला सांगितले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड दिसल्याने पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पैशांची मोजणी केली असता तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी आयकर विभागाला याबाबत माहिती दिली असून रोकडही आयकर विभागाच्या स्वाधीन केली आहे. तो भिक्षेकरू कोण आहे, इतकी रोकड त्याने कोठून आणली होती. याबाबत अद्याप माहिती मिळली नाही.

राज्य, देश विदेशातील विश्वसनीय बातम्यांसाठी गूगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करा Etv Bharat APP

ABOUT THE AUTHOR

...view details