महाराष्ट्र

maharashtra

Parliament Budget Session 2022 : युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्यसभेत परराष्ट्र मंत्री देतील निवेदन

By

Published : Mar 14, 2022, 3:09 PM IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मंगळवारी सभागृहात ( S Jaishankar Will Give Statement On Student Return From Ukraine ) रशिया-युक्रेन संकटावर निवेदन देतील, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू ( Rajya Sabha President M Venkaiah Naidu ) यांनी सोमवारी दिली.

Parliament Budget Session 2022
Parliament Budget Session 2022

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मंगळवारी सभागृहात ( S Jaishankar Will Give Statement On Student Return From Ukraine ) रशिया-युक्रेन संकटावर निवेदन देतील, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू ( Rajya Sabha President M Venkaiah Naidu ) यांनी सोमवारी दिली. तसेच युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांचे नायडू यांचे कौतुकही केले.

झीरो तासादरम्यान, सभागृहाच्या अनेक सदस्यांनी युक्रेनमधून वैद्यकीय अभ्यासक्रम अर्धवट सोडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्या विषयी चिंता व्यक्त केली. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार के.रवींद्र कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा आता सुनिश्चित केली गेली असल्याने केंद्र सरकारने त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत, असे काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटले.

युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये दोन ते पाच टक्के जागा राखीव ठेवाव्यात. देशभरातील महाविद्यालयांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी बिजू जनता दलाचे (बीजेडी) खासदार डॉ. अमर पटनायक आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डॉ.शंतनू सेन यांनी केली.

हेही वाचा -Gavkar Interim Chairman : आ. गणेश गावकर यांंची गोव्याच्या हंगामी सभापती पदी निवड

ABOUT THE AUTHOR

...view details