महाराष्ट्र

maharashtra

Pulwama Encounter : पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू, जवानांचा परिसराला वेढा

By

Published : Mar 18, 2023, 10:21 AM IST

पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. पुलवामाच्या मित्रीगाम भागात चकमक सुरू झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Pulwama Encounter
पुलवामात चकमक

पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील मित्रगाम भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मित्रगाम गावात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली. संयुक्त लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफचे पथक संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

पंडिताची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा : यापूर्वी सुरक्षा दलांनी मुश्ताक भट नावाच्या दहशतवाद्याचा खात्मा केला होता. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची पुलवामा येथे दहशतवादी मुश्ताक भटने हत्या केली होती. यानंतर सुरक्षा दलांनी ४८ तासांच्या आत त्याचा खात्मा केला. मुश्ताक भट द रेझिस्टन्स फ्रंट आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

जानेवारीत देखील झाली होती चकमक : यापूर्वी जानेवारीत देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचा दहशतवादी सलीम परे मारला गेला होता. पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या प्रकरणी माहिती दिली होती. शमीम परेसह आणखी एक वाँटेड दहशतवादी मारला गेल्याचे त्यांनी सांगितले होते. श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी समीम परेचा खात्मा केला होता.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट : 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी घटना कमी झाल्याचे दिसून आले आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी अलीकडेच म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. आता केंद्र सरकारने येथील विकासकामांना गती देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा :Putin Arrest Warrant : युद्ध करणाऱ्या पुतिन विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून अटक वॉरंट जारी; रशियाने म्हटले याला काही...

ABOUT THE AUTHOR

...view details