महाराष्ट्र

maharashtra

महिलेच्या पोटातून काढली 11 किलोची गाठ; प्रकृती ठीक असल्याची डॉक्टरांची माहिती

By

Published : Apr 29, 2022, 1:37 PM IST

हरियाणातील यमुनानगरमध्ये एका महिलेच्या पोटातून 11 किलोची गाठ बाहेर आली आहे. हे पाहून रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरही हैराण झाले. (woman stomach in Yamunanagar, Haryana) डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारचा ट्यूमर 10 दशलक्ष लोकांपैकी एकामध्ये आढळतो.

अग्रवाल हॉस्पिटल
अग्रवाल हॉस्पिटल

यमुनानगर: हरियाणातील यमुनानगर येथील एका महिला रुग्णाच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून अकरा किलोची गाठ काढली आहे. यासोबतच चार फुटांचा कॅन्सरयुक्त आतड्याचा भागही यशस्वीपणे काढण्यात आला आहे. (Tumor found In woman stomach) यमुनानगर येथील डॉ. अनिल अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. सध्या ऑपरेशननंतर महिला पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला येथील शहजाद पुर गावात राहणाऱ्या एका महिलेला गंभीर अवस्थेत डॉक्टर अनिल अग्रवाल यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Success Removing Knot Woman Stomach) या महिलेच्या पोटात गेल्या अनेक दिवसांपासून असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे महिलेला तीन दिवस सतत उलट्या होत होत्या. पोटदुखी कमी होत नसल्याने महिला डॉक्टरांकडे गेली. रुग्णालयात त्या संबंधीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. सुरुवातीला महिलेला आपण गर्भवती असल्याचे समजले. मात्र, चाचणीचा अहवाल आल्यावर तीच्या पोटात मोठी गाठ असल्याचे समोर आले.


डॉ. अनिल अग्रवाल यांनी महिलेची सलग 8 तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या मते, महिलेला होणाऱ्या या आजाराला 'रेट्रो पेरिटोनियल फायबर सारकोमा' म्हणतात. हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. हा आजार कोटींमधून एखाद्या व्यक्तीला होतो. डॉ. अनिल अग्रवाल यांना राज्यपालांनी १२ वेळा सन्मानित केले आहे. राष्ट्रीय स्तरावरही त्यांना अनेकदा सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सर्जन शिकागो अमेरिकेने मानद फेलोशिपनेही सन्मानित केले आहे.

हेही वाचा -Non Muslim village In Bihar : हा खरा भारत! गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज

ABOUT THE AUTHOR

...view details