महाराष्ट्र

maharashtra

Rahul Gandhi News : राहुल गांधी अडचणीत...दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात पाठविली नोटीस

By

Published : Mar 17, 2023, 7:29 AM IST

दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून पोलिसांनी त्यांच्याकडून तपशील मागवला आहे. राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान हे कथित वक्तव्य केले होते.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली :भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, महिलांना अजूनही लैंगिक छळाचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, राहुल गांधी यांना पीडित महिलांबद्दल तपशील देण्यास सांगितले आहे. जेणेकरून या प्रकरणी कारवाई केली जाऊ शकते आणि त्या महिलांना सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते.

पीडित महिलांची माहिती मागवली : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी राहुल गांधी यांना एक प्रश्नावलीही पाठवली असून त्यात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची तपशीलवार माहिती मागवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान हे कथित वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी ऐकले आहे की देशात अजूनही महिलांचा लैंगिक छळ होत आहे.

माफी मागण्यास नकार : राहुल गांधी नुकतेच ब्रिटनहून परतले आहेत. तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान दिले होते. तेथील त्यांच्या एका विधानावरून सध्या संसदेत गदारोळ सुरू आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने मात्र माफी न मागण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, त्यांना संसदेत उत्तर द्यायचे आहे. मात्र मला तिथेही बोलू दिले जाणार नाही याची खात्री आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, असे देखील ते म्हणाले. त्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने म्हटले की, गोष्टी फिरवण्यापेक्षा राहुल यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी.

हेही वाचा :BJP : भाजपचे राहुल गांधींना प्रत्युत्तर! देशाची परदेशात अपमानाची तुमची सवय मोडून काढणार

ABOUT THE AUTHOR

...view details