महाराष्ट्र

maharashtra

Smriti Irani Plea : दिल्ली कोर्टाचे कॉंग्रेस नेत्यांना समन्स; स्मृती इराणीच्या मुलीबद्दलच्या सोशल मीडियावरील पोस्ट काढून टाकण्याचे दिले आदेश

By

Published : Jul 29, 2022, 4:14 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले. ( Delhi High Court issues summons to Congress leaders )

Smriti Irani Plea
दिल्ली कोर्टाचे कॉंग्रेस नेत्यांना समन्स

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स ( Delhi High Court issues summons to Congress leaders ) बजावले. केंद्रीय मंत्री इराणी यांनी तिच्या आणि त्यांच्या मुलीवर बिनबुडाचे आरोप लावल्याबद्दल 2 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई मागितली आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट काढून टाकण्याचे दिले आदेश - न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी काँग्रेस नेत्यांना इराणी आणि त्यांच्या मुलीवरील आरोपांसंदर्भात सोशल मीडियावरून ट्वीट, रिट्विट्स, पोस्ट, व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून टाकण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की जर प्रतिवादी 24 तासांच्या आत त्यांच्या निर्देशांचे पालन करत नसेल तर ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने संबंधित सामग्री काढून टाकावी.

कॉंग्रेसने केली होती मागणी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात ‘बेकायदेशीर बार’ चालवल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली.

हेही वाचा -Smriti Irani On Congress : गोवा अनधिकृत बार प्रकरणावरुन कॉंग्रेसचे स्मृती इराणीवर आरोप; इराणींनीही दिले जोरदार प्रत्युत्तर, पाहा कोण काय म्हणाले..

ABOUT THE AUTHOR

...view details