महाराष्ट्र

maharashtra

Todays Bitcoin Rate : आज किती आहे बिटकॉइनचा दर..? घ्या जाणून सविस्तर

By

Published : Jul 3, 2022, 7:06 AM IST

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.२७ टक्के रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख १४ हजार ९३३ रुपये इतकी आहे.

Todays Bitcoin Rate
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख १४ हजार ९३३ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १९ हजार १७१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख १४ हजार ९३३ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०५८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८३ हजार ५५२ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.२२ रुपये इतका आहे.

हेही वाचा :Todays Petrol Rate : औरंगाबादेत पेट्रोल- डिझेलच्या किमतीचा भडका.. ठाण्यातही झाली वाढ.. पहा राज्यभरातील आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details