महाराष्ट्र

maharashtra

Fire By CRPF Constable : जोधपूरमध्ये सीआरपीएफ जवानाचा हवेत गोळीबार, कुटुंबाला ठेवले ओलिस

By

Published : Jul 11, 2022, 12:36 PM IST

Updated : Jul 11, 2022, 12:43 PM IST

Fire By CRPF Constable

रविवारच्या सुट्टीवरून संतप्त झालेल्या जोधपूरमधील सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात रविवारी एका जवानाने अचानक गोळीबार ( CRPF Constable Firie In Jodhpur ) केला. त्यामुळे या केंद्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. गोळीबारानंतर या जवानाने आपल्या परिवारासह स्वतःला ओलिस ( CRPF Constable Hostages Family ) ठेवले आहे. आपण केवळ पोलिस महासंचालकांशीच चर्चा करू असे त्याने म्हटले आहे. रविवारी सायंकाळपासून त्याने आठवेळा हवेत गोळीबार केला आहे.

जोधपूर - जोधपूर शहरामधील मंडलनाथ चौकाच्या पुढे असलेल्या पालडी खिंचीया भागामध्ये असलेल्या सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये एका जवानाने रविवारी रात्री आपल्या परिवारातील सदस्यांसहित स्वतःलाच ओलिस ठेवले. ( CRPF Constable Hostages Family ) या जवानाने आठवेळा हवेत गोळीबार ( CRPF Constable Firie In Jodhpur ) केला. त्याने आठ फैरी झाडल्या. गेल्या 17 तासांपासून सीआरपीएफचे अधिकारी या जवानास समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याने कोणाचेही ऐकलेले नाही. रविवारी सुरू झालेल्या नाट्यमय घटनेतील जवानाचे नाव नरेश जाट असे आहे. आपल्या अधिकाऱ्यासोबत रविवारच्या सुट्टीवरून त्याचा वाद झाला आणि त्याने हे आक्रमक पाऊल उचलल्याचे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस महानिरीक्षकांशीच बोलणार -या जवानाने कोणत्याही अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आपल्याला कोणत्याही अधिकाऱ्यावर विश्वास नाही, असे त्याचे म्हणणे आहे. आपण केवळ पोलिस महानिरीक्षकांशीच चर्चा करू असे तो म्हणाला. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक अजमेरहून जोधपूर येथे पोहोचले आहेत. दरम्यान, या परिसरात एटीएस सहित अन्य सुरक्षा जवान, कमांडोंना तैनात करण्यात आले आहे.

जवानाला समजविण्याचा प्रयत्न

रविवारच्या सुट्टीवरून नाराजी -रविवारच्या सुट्टीवरून या जवानाचा आपल्या अधिकाऱ्यांशी वाद झाला होता. संतापाच्या भरात त्याने नंतर एका जवानाचा हातही कापला होता. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हा अस्वस्थ असलेला जवान सीआरपीएफ केंद्राच्या परिसरात असलेल्या आपल्या घरी गेला आणि त्याने परिवारासहित स्वतःलाही येथे कोंडून घेतले. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी आहे. आतापर्यंत त्याने आठवेला हवेत गोळीबार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त रविदत्त गौड यांच्यासह अन्य अधिकारीही सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात पोहोचले आहेत.

समजावण्याचा प्रयत्न -आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हा सीआरपीएफचा जवान नाराज आहे. डीसीपी अमृता दुहान यांनी सांगितले की, त्याच्या चर्चा करून त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या जवानाच्या अन्य नातेवाईकांनाही येथे बोलावण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून हा जवान सीआरपीएफमध्ये नोकरीस आहे. अचानक विद्रोहाचे पाऊल उचलणारा नरेश जाट हा जवान पाली जिल्ह्यातील राजोला कला येथील रहिवासी आहे. रविवारच्या सुट्टीवरून अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर या जवानाने सायंकाळी पाच वाजता पहिल्यांदा हवेत गोळी झाडली. त्यामुळे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अमृता दुहान यांनी सांगितले की, हा जवान दारु प्यायलेला असून अधिकाऱ्यांशी बोलायला तयार नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यासाठी पाली जिल्ह्यात असलेले त्याचे वडील आणि भावाला पाचारण करण्यात आले आहे. त्याने आपल्या वडिलांशी फोनवर बातचित केली, परंतु अद्याप तो शांत झालेला नाही.

वडिलांचेही ऐकले नाही -पालीमध्ये वाहतूक पोलिस विभागात नोकरी करणाऱ्या नरेशच्या भावाने पोलिसांना सांगितले की, सात-आठ महिन्यांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर तो त्याचा स्वतःवर ताबा राहात नाही. एखाद्या घटनेवरून अचानक तो संतप्त होतो आणि नको ते कृत्य करू लागतो. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नरेशच्या वडिलांनी त्याच्याशी फोनवरून समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकायला तयार नाही. तो सारखा मारून टाकण्याची आणि स्वतःलाही संपविण्याची भाषा करीत आहे.

जवानाच्या रायफलमध्ये 40 गोळ्या -अचानक आक्रमक झालेल्या नरेश जाट या जवानाच्या इंसास रायफलच्या दोन मॅगजीन आहेत. यातील एकामध्ये 20 गोळ्या असतात. दोन्ही मिळून त्याच्याजवळ बंदूकीच्या चाळीस गोळ्या आहेत. यातून त्याने आठवेळा हवेत गोळीबार केला आहे. अद्याह त्याच्याजवळ 32 बंदुकीच्या गोळ्या बाकी असल्याने अधिकारीही तणावात आहेत.

हेही वाचा -Maharashtra Breaking News : काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार

Last Updated :Jul 11, 2022, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details