महाराष्ट्र

maharashtra

CRPF ASI shoots himself : आयबी संचालकाच्या घरी तैनात असलेल्या एएसआयने स्वतःवरच झाडली गोळी

By

Published : Feb 4, 2023, 7:38 PM IST

दिल्लीतील तुघलक रोड भागात गुप्तहेर खात्यातील संचालकाच्या घरी सुरक्षेत असलेल्या सीआरपीएफच्या एएसआयने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. एएसआय राजबीर कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी 4.15 च्या सुमारास स्वत:वर गोळी झाडली. त्याच्याकडून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

CRPF ASI shoots himself dead at IB director's residence in Delhi
आयबी संचालकाच्या घरी तैनात असलेल्या एएसआयने स्वतःवरच झाडली गोळी

नवी दिल्ली : दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) असिस्टंट सब इन्स्पेक्टरने (एएसआय) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हा सीआरपीएफ एएसआय तुघलक रोड भागातील इंटेलिजन्स ब्युरो डायरेक्टरच्या घरी सुरक्षेत तैनात होता. प्राथमिक तपासानुसार, राजबीर कुमारने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडून घेतल्याचा आरोप आहे. मृताकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

अनेक दिवसांपासून होते रजेवर:पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफमध्ये तैनात असलेले ५३ वर्षीय एएसआय राजबीर मध्य प्रदेशचे रहिवासी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते रजेवर होते. गेल्या शुक्रवारीच तो ड्युटीवर परतला होता. त्यांची पोस्टिंग इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांच्या बंगल्यावर होती, मात्र शुक्रवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास राजबीरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू:मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलीस अधिक तपास करत आहेत. एएसआयच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी सीआरपीसी कलम १७४ अन्वये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी कर्तव्यावर असलेल्या इतर जवानांची चौकशी करून आत्महत्येचे कारण काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासोबतच ही आत्महत्या काही घरगुती कारणातून झाली आहे का, याचीही माहिती कुटुंबीयांकडून घेतली जात आहे.

गेल्या वर्षीही झाली होती अशीच एक आत्महत्या:एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांच्या निवासस्थानी एक गार्ड पोस्ट तैनात करण्यात आली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाने (एसआय) दिल्लीच्या पश्चिम जिल्ह्यातील पंजाबी बाग भागात राहत्या घराच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी घनश्याम बन्सल यांनी सांगितले की, बेनी पीए असे मृताचे नाव आहे. पंजाबी बाग पोलीस कॉलनीत ते कुटुंबासह राहत होते. त्यांची पोस्टिंग बाह्य जिल्ह्यातील एचसीआर शाखेत होती.

असिस्टंट कमांडंटनेही केली होती आत्महत्या:अशाच प्रकारच्या घटनेत, CRPF च्या 33 वर्षीय असिस्टंट कमांडंटने 2019 मध्ये स्वतःच्या वैयक्तिक शस्त्राने गोळी झाडून आत्महत्या केली होती. कार्यालयात 40 व्या बटालियनचे एम अरविंद 23 ऑगस्ट 2019 रोजी अनंतनागच्या सदर भागात त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. माहितीनुसार, अरविंद 2014 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात थेट-प्रवेश अधिकारी म्हणून रुजू झाले होते.

हेही वाचा: Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेंडला वैतागून बॉयफ्रेंडने केली हत्या, तुकडे-तुकडे करून दिले फेकून

ABOUT THE AUTHOR

...view details