महाराष्ट्र

maharashtra

Corona In India : कोरोनाचा कहर सुरूच, भारतात 11 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

By

Published : Apr 14, 2023, 4:05 PM IST

देशात आज दिवसभरात 11 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मास्क लावण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे.

Corona
कोरोना

नवी दिल्ली : भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 11,109 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,97,269 झाली आहे. गेल्या 236 दिवसांत एका दिवशी नोंदवलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 49,622 वर पोहोचली आहे.

मृतांची संख्या 5 लाखांच्या वर : शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश महाराष्ट्र, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्या लोकांची संख्या 5,31,064 वर पोहोचली आहे.

संसर्गाचा दैनंदिन दर 5.01 : टक्केताज्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या संसर्गाचा दैनंदिन दर 5.01 टक्के एवढा आहे. तर साप्ताहिक दर 4.29 टक्के एवढा आहे. सध्या देशात 49,622 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.11 टक्के आहे. सध्या देशात रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.70 टक्के एवढा आहे. आतापर्यंत एकूण 4,42,16,586 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड - 19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.

इतके अँटी - कोविड 19 लसींचे डोस : आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतात देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220,66,25,120 अँटी - कोविड 19 लसींचे डोस देण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख तर 5 सप्टेंबर पर्यंत 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर पर्यंत संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर पर्यंत 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत 70 लाख, 29 ऑक्टोबर पर्यंत 80 लाख तर 20 नोव्हेंबरला 90 लाखांवर गेली होती. 19 डिसेंबर पर्यंत देशात रुग्णांच्या संख्येने एक कोटींचा आकडा पार केला होता.

हेही वाचा :World Hemophilia Day 2023 : काय आहे जागतिक हिमोफिलिया दिवसाचा इतिहास, जाणून घ्या हिमोफिलिया आजाराची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details