महाराष्ट्र

maharashtra

Siddhi Naik death सिद्धी नाईक प्रकरणी गोवा पोलिसांनी दाखल केला क्लोजर रिपोर्ट म्हणाले

By

Published : Aug 16, 2022, 2:11 PM IST

गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी कळंगुट बीचवर 19 वर्षीय सिद्धी नाईक Siddhi Naik death हिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या Closure report of Siddhi Naik case गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

closure report of Siddhi Naik case
सिद्धी नाईक

पणजी गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी कळंगुट बीचवर 19 वर्षीय सिद्धी नाईक Siddhi Naik death हिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या Closure report of Siddhi Naik case गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

हेही वाचासदैव अटल अटलबिहारी वाजपेयींची पुण्यतिथी जाणुन घेऊया त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास केला आहे. आम्ही या खटल्यातील आणखी साक्षिदारांचे जबाब नोंदवले आहेत, पण काहीही सापडले नाही. आम्ही क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. कोर्टाला निर्णय घेऊ द्या, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

अर्धनग्न अवस्थेत आढळला होता मृतदेहकॅलनगुट समुद्रकिनारी अर्धनग्न अवस्थेत सिद्धी नाईक या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पोलिसांनी अहवाल सादर केला होता. या अहवालावर काँग्रेसने संशय व्यक्त करत कॅलनगुट पोलीस स्टेशनला घेराव घालत पोलिसांना याप्रकरणी जाब विचारला होता.

मृत्यूपूर्वी सर्व सोशल मीडिया खाती केली होती डिलीटकामावर जाण्यापूर्वी सिद्धीने आपला फोन घरीच ठेवला होता. त्यातच तिने आपले सोशल मीडियावरील सर्व खाती बंद केल्यामुळे संशय आणखीनच वाढला होता.

काँग्रेसचा आरोपग्रीन पार्क येथून बेपत्ता झालेल्या सिद्धी नाईकचा मृतदेह कॅलनगुट समुद्रकिनारी अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार, सिद्धीचा मृत्यू हा समुद्रात बुडून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, घटनास्थळी सिद्धीचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला त्यानुसार तिच्यावर बलात्कार किंवा तत्सम घटना घडली असावी. या प्रकरणाची खरी माहिती पोलीस लपवित असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

सिद्धी नाईक प्रकरणावरून पेटले होते राजकारणसिद्धी नाईक हिच्या मृत्यूवरून प्रचंड राजकारण झाले होते. विरोधकांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरत आंदोलने, मोर्चे व कँडल मार्च देखील काढला होता.

हेही वाचाKashmiri Pandit Shot Dead जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या भाऊ गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details