महाराष्ट्र

maharashtra

Budget 2023 : तुमचे पॅन कार्ड झाले तुमच्या ओळखीचा पुरावा

By

Published : Feb 1, 2023, 12:50 PM IST

Updated : Feb 1, 2023, 1:04 PM IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023चा अर्थसंकल्प सादर करत असताना पॅन कार्डला ओळखीचा पुरावा म्हणुन मान्यता दिली आहे. आत्ता पर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणारे पॅन कार्ड आता ओळखीचा पुरावा म्हणुन वापरले जाणार आहे. (Income tax department)

PAN card is your proof of identity
पॅन कार्ड झाले ओळखीचा पुरावा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. असे सांगत त्यांनी अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा आणि तरतुदी. जाहिर केल्या त्यात तुमचे पॅन कार्ड आता तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणुन वापरता येणार आहे.

देशातील रहीवासीयांसाठी पॅन कार्ड असने आवश्यक आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतं‍त्र 'परर्मनंट अकाउंट नंबर' बनवण्याचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या देखरेखीसाठी प्राप्तीकर विभाग करते. एक दिवसाचा शिशू असो अथवा 60 वर्षांचा वयस्क, पॅन सगळ्यांसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. कार्डमागील 10 आकडी क्रमांक प्रत्येक व्यक्तीची युनिक ओळख आहे. या क्रमांवरून व्यक्तीचा आर्थिक व्यवहाराचा तपशील तपासला जातो. पगारदार व्यक्ती तसे व्यापर करणार्‍या उद्योजकाकडेही ते असणे आवश्यक आहे. त्यानुसार सरकार त्याच्या आर्थिक व्यवहारावर कर निश्चित करत असते. वसूल केलेला कर देशाच्या विकासकामासाठी खर्च केला जातो

पॅन कार्ड असे एक कार्ड आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. पॅन कार्ड नंबर म्हणजे एक प्रकारे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी आवश्यक असते. पॅन कार्डचा फुल फॉर्म पर्मनंट अकाऊंट नंबर असा आहे. पॅन कार्ड वर 10 अंकाचा विशेष कोड असतो किंवा नंबर असतो. त्यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि इंग्रजी अंक दिलेले असतात.

पॅनकार्डसाठी अर्ज केलेल्याना आयकर विभाग कार्ड देते. हे कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटशी जोडले जातात. टॅक्स भरणे, क्रेडिट कार्डद्वारे केलेले आर्थिक व्यवहार या सर्वांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नजर असते. जगात जेवढे पण देश आहेत आणि त्या देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कारण त्या ओळखपत्राद्वारेच आपण हे माहिती करू शकतो की तो कोणत्या देशाचा रहिवाशी आहे. आपल्या देशातील लोकांकडे पण खूप प्रकारचे ओळखपत्र आहेत, जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, इ. याचबरोबर अजून एक ओळख देण्यासाठी आणि याचबरोबर बॅंकेच्या आणि व्यवहारासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पॅन कार्ड. या पॅन कार्डला या अर्थसंकल्पात केलेल्या घोषने प्रमाणे आता ओळखीचा अधिकृत पुरावा म्हणुन वापर करता येणार आहे.

हेही वाचा :Budget 2023: अर्थसंकल्प २०२३.. काय स्वस्त, काय महाग.. पहा संपूर्ण यादी..

Last Updated : Feb 1, 2023, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details