महाराष्ट्र

maharashtra

उत्तर प्रदेश : सावत्र आईने केली 10 वर्षांच्या मुलीची हत्या, चाकूचे तब्बल 15 वार

By

Published : Aug 26, 2020, 2:51 PM IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी झोपलेली असताना तिच्या सावत्र आईने घरातील कामे पूर्ण न केल्याबद्दल तिच्या तोंडावर लाथ मारली. यानंतर मुलीचा आणि रितूचा वाद झाला आणि रागाच्या भरात रितूने या मुलीवर तब्बल १५ हून अधिक वेळा वार केले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सावत्र आई रितूने पतीच्या मदतीने मुलीला घरातील जागेतच पुरले.

सावत्र आईने केली 10 वर्षांच्या मुलीची हत्या
सावत्र आईने केली 10 वर्षांच्या मुलीची हत्या

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली येथील इज्जतनगर भागात एका महिलेने तिच्या दहा वर्षाच्या सावत्र मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या प्रकरणी महिलेसह तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव रितू असून तिचा पती रवी बाबू बरेली येथील महापालिकेचा कर्मचारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी झोपलेली असताना तिच्या सावत्र आईने घरातील कामे पूर्ण न केल्याबद्दल तिच्या तोंडावर लाथ मारली. यानंतर मुलीचा आणि रितूचा वाद झाला आणि रागाच्या भरात रितूने या मुलीवर तब्बल १५ हून अधिक वेळा वार केले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सावत्र आई रितूने पतीच्या मदतीने मुलीला घरातील जागेतच पुरले.

मृत अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र आईने वारंवार शारीरिक अत्याचार केले होते. हे अत्याचार अत्यंत भयंकर असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. जेव्हा ही मुलगी अचानक गायब झाली, तेव्हा शेजार्‍यांना ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास सुरू केला. रविवारी पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मोठ्या प्रमाणात इजा झालेला आणि सडलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा -देशात गेल्या २४ तासात ६७ हजार कोरोनाबाधित; एकूण आकडा ३२ लाखांवर

यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या पालकांची चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी मुलीची सावत्र आई आणि आत्याने तिची हत्या केली आणि तिच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी मृतदेह घरातच पुरला. पोलिसांनी मृत मुलीची सावत्र आई, वडिलांना अटक केली आहे. तर, आत्या फरार असून तिला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सोमवारी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, मुलीला काठी किंवा धोपटण्यासारख्या वस्तूने मारहाण केल्याचे आणि चाकूने भोकसल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत मुलीवर तब्बल १५ हून अधिक चाकूचे वार करण्यात आले आहेत. यामुळे तिच्या अवयवांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे समोर आले आहे.तिच्या आतड्यांमधून मलही बाहेर पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सावत्र आई, आत्या आणि वडील अशा तिघांवर हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details