महाराष्ट्र

maharashtra

बरेलीमध्ये चोरीच्या संशयावरून मॉब लिंचिंग; झाडाला बांधून जमावाने मरेपर्यंत मारले

By

Published : Sep 5, 2020, 4:10 PM IST

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये चोरी संशयावरून मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. बासिद खान असे मृत तरुणाचे नाव आहे.

मॉब लिंचिंग
मॉब लिंचिंग

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये चोरी संशयावरून मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. बासिद खान असे मृत तरुणाचे नाव आहे. बासिद खानला चोरीच्या संशयावरून जमावाने झाडाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

बरेलीमध्ये चोरी संशयावरून मॉब लिंचिंग

बासिद खान दारूच्या नशेत फिरत असल्याने त्याला चोर समजून सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केली. ते ऐकून तिथे लोक जमले. जमावाने त्याला झाडाला बांधले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवत तरुणाची सुटका केली. जमावाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या बासिदला कुटुंबीयांनी एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाचा शुक्रवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला की, इतर कशामुळे याचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे शवविच्छेदन केले जाईल. तसेच घटनेचा तपास सुरु असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बासिदच्या मृत्यूनंतर खबरदारी म्हणून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details