महाराष्ट्र

maharashtra

जेट एअरवेज खरेदी करणार का? पाहा आनंद महिंद्रा काय म्हणतात...

By

Published : Jun 30, 2019, 11:48 PM IST

‘जर तुम्हाला लखपती बनायचं असेल तर आधी एअरलाइन्स उद्योगात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करा’ असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले आहे.

आनंद महिंद्रा

नवी दिल्ली - आर्थिक दिवाळखोरीमुळे जेट एअरववेज विमानकंपनी टाळं लागण्याच्या मार्गावर आहे. तेथील कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, हा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा स्थितीत एका ट्विटर युजरने थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांना 'आपण जेट एअरवेज खरेदी करा आणि त्याचं नाव महिंद्रा एअरवेज असं ठेवा,' असे सुचवले. यावर आनंद महिंद्रा यांनी त्या युजरला लगेच हजरजबाबी उत्तरही दिले.

ललित मथपाल असे या युजरचे नाव आहे. त्याने महिंद्रा यांना जेट एअरवेज खरेदी करण्याविषयी सुचवले. त्याला रिप्लाय देताना महिंद्रा यांनी जेट एअरवेज विकत घेणार की नाही, याबाबत थेट उत्तर दिलेले नाही. मात्र, त्यांनी इंग्रजी भाषेतल्या एका म्हणीचा वापर करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. ‘जर तुम्हाला लखपती बनायचं असेल तर आधी एअरलाइन्स उद्योगात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करा’ असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले आहे. एक प्रकारे एअरलाइन्स उद्योगात उतरणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे असल्याचे महिंद्रा यांचे म्हणणे असल्याचे या उत्तरावरुन स्पष्ट होत आहे.

महिंद्रा यांचे हे उत्तर नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. अनेक जणांनी एअरलाइन्स उद्योगात न जाण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हातही दिला आहे.

जेट एअरवेज खरेदी करणार का? पाहा आनंद महिंद्रां काय म्हणतात...
नवी दिल्ली - आर्थिक दिवाळखोरीमुळे जेट एअरववेज विमानकंपनी टाळं लागण्याच्या मार्गावर आहे. तेथील कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, हा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा स्थितीत एका ट्विटर युजरने थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांना 'आपण जेट एअरवेज खरेदी करा आणि त्याचं नाव महिंद्रा एअरवेज असं ठेवा,' असे सुचवले. यावर आनंद महिंद्रा यांनी त्या युजरला लगेच हजरजबाबी उत्तरही दिले.
ललित मथपाल असे या युजरचे नाव आहे. त्याने महिंद्रा यांना जेट एअरवेज खरेदी करण्याविषयी सुचवले. त्याला रिप्लाय देताना महिंद्रा यांनी जेट एअरवेज विकत घेणार की नाही, याबाबत थेट उत्तर दिलेले नाही. मात्र, त्यांनी इंग्रजी भाषेतल्या एका  म्हणीचा वापर करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. ‘जर तुम्हाला लखपती बनायचं असेल तर आधी एअरलाइन्स उद्योगात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करा’ असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले आहे. एक प्रकारे एअरलाइन्स उद्योगात उतरणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे असल्याचे महिंद्रा यांचे म्हणणे असल्याचे या उत्तरावरुन स्पष्ट होत आहे.
महिंद्रां यांचे हे उत्तर नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. अनेक जणांनी एअरलाइन्स उद्योगात न जाण्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हातही दिला आहे.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details