महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली को बंगाल से डर लगता है! चित्ररथ नाकारल्याने टीएमसी नेत्याची टीका

By

Published : Jan 2, 2020, 6:22 PM IST

यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे.

दिल्ली को बंगाल से डर लगता है! चित्ररथ नाकारल्याने टीएमसी नेत्याची टीका
दिल्ली को बंगाल से डर लगता है! चित्ररथ नाकारल्याने टीएमसी नेत्याची टीका

नवी दिल्ली -यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेस नेता मदन मित्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. बंगालसाठी हे नवे नसून दिल्ली बंगालला घाबरते, अशी टीका मदन मित्रा यांनी केली आहे.

बंगालसाठी हे नवीन नाही. दिल्ली ही बंगालला घाबरते. त्यांनी बंगालचा चित्ररथ रद्द केलायं आणि बंगाल राज्यात एनआरसी आणि सीएए रद्द करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया मदन मित्रा यांनी दिली आहे. बंगालसह महाराष्ट्र राज्याचाही चित्ररथ नाकरण्यात आला आहे. चित्ररथावरून राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे.

यंदा कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथ करण्याचा बंगाल सरकारचा प्रस्ताव होता. गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा बंगालचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. याआधी २०१५ मध्ये बंगालचा चित्ररथ नाकारण्यात आला होता. नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यानेच प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. देशातील अनेक राज्ये ६ जानेवारीला दिल्लीमध्ये राजपथावर होणाऱ्या संचालनात चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी काही ठराविक राज्यांनाच संधी दिली जाते. यावेळी १६ राज्यं आणि सहा केंद्रीय मंत्रालयं अशा एकूण २२ चित्ररथांचा समावेश करण्यात आला.

दिल्ली को बंगाल से डर लगता है! चित्ररथ नाकारल्याने टीएमसी नेत्याची टीका

नवी दिल्ली - यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेस नेता मदन मित्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. बंगालसाठी हे नवे नसून दिल्ली बंगालला घाबरते, अशी टीका मदन मित्रा यांनी केली आहे.

बंगालसाठी हे नवीन नाही. दिल्ली ही बंगालला घाबरते. त्यांनी बंगालचा चित्ररथ रद्द केलायं आणि बंगाल राज्यात एनआरसी आणि सीएए रद्द करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया मदन मित्रा यांनी दिली आहे. बंगालसह महाराष्ट्र राज्याचाही चित्ररथ नाकरण्यात आला आहे. चित्ररथावरून राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे.

यंदा कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथ करण्याचा बंगाल सरकारचा प्रस्ताव होता. गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा बंगालचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. याआधी २०१५ मध्ये बंगालचा चित्ररथ नाकारण्यात आला होता. नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यानेच प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे.  बंगालसह

६ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी काही ठराविक राज्यांनाच संधी दिली जाते. यावेळी १६ राज्यं आणि सहा केंद्रीय मंत्रालयं अशा एकूण २२ चित्ररथांचा समावेश करण्यात आला.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details