महाराष्ट्र

maharashtra

जेव्हा स्मृती इराणी सोनिया गांधींना विचारतात... "रसोडे में कौन था?"

By

Published : Sep 7, 2020, 2:10 PM IST

रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी "रसोडे में कौन था?" या मजेदार रॅप गाण्याचे वेगळे व्हर्जन शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी या कोकिलाबेन यांचे प्रसिद्ध संवाद 'रसोडे में कौन था?' हे लिप सिंक करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

स्मृती ईरानी
स्मृती ईरानी

नवी दिल्ली - युवा संगीतकार यशराज मुखाते याने ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील एका संवादाला म्युझिक देऊन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याचा वापर करून नेटेकरी अनेक वेग-वेगळे व्हिडीओ तयार करत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असाच एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

"रसोडे में कौन था?"

रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मजेदार रॅप गाण्याचे वेगळे व्हर्जन शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी या कोकिलाबेन यांचे प्रसिद्ध संवाद 'रसोडे में कौन था?' हे लिप सिंक करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांना राशी आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींना गोपी बहुच्या पात्रामध्ये दाखवले आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी दिसलेल्या 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील सासू आणि दोन सुनांची पात्रं प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. याच मालिकेतील 'रसोडे में कौन था?' या डायलॉगवर हे मॅशअप तयार करण्यात आलं आहे. या मॅशअपला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details