महाराष्ट्र

maharashtra

बंगळुरात एनआयएची कारवाई, दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

By

Published : Oct 8, 2020, 8:42 PM IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने कर्नाटकातील बंगळुरू शहरातून आज(गुरुवार) दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोघेजण देशात कट्टरतावाद पसरवत असून परदेशी निधी मिळवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

NIA arrests terror suspects
संशयित दहशतवाद्याच्या अटक

बंगळुरू - राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) कर्नाटकातील बंगळुरू शहरातून आज(गुरुवार) दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अहमद अब्दुल चेडर आणि इर्फान नासीर अशी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अहमद अब्दुल चेडर हा चेन्नईतील एका बँकेत व्यवसाय विश्लेषक(बिझनेस अ‌ॅनालिस्ट) असून नासीर इर्फान हा बंगळुरातील तांदुळ व्यापारी आहे. बंगळुर शहरात ईसीस दहशतवाद्यांच्या कारवायासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने १९ सप्टेंबर २०२० ला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे.

दोघेजण देशात कट्टरतावाद पसरवत असून परदेशी निधी मिळवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एनआयएने याआधी बंगळुरातील एम. एस. रमीहा रुग्णालयातील डॉ. अब्दुल रहमान यांना इसिसशी संबंध असल्यावरून अटक केले होते. रहमान यांच्याशी आज अटक केलेल्या दहशतवाद्यांचे संबंध आहेत. इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी रहमान यांनी दोघांना मदत केल्याचे तपासात पुढे आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details