महाराष्ट्र

maharashtra

मनोहर लाल खट्टर यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

By

Published : Oct 27, 2019, 3:35 PM IST

मनोहर लाल खट्टर यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा चंदीगडच्या राजभवनात पार पडला.

मनोहर लाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

हरयाणा -भाजप-जेजेपी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज मनोहर लाल खट्टर यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून शनिवारी एकमताने मनोहर लाल खट्टर यांची निवड करण्यात आली होती. मनोहर लाल खट्टर यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा चंदीगडच्या राजभवनात पार पडला.

हेही वाचा -बीएसएफचे माजी जवान तेज बहादूर यादव यांचा जेजेपीला रामराम

शुक्रवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत चौटाला यांनी हरियाणामध्ये भाजपाला पाठिंबा देऊन युतीची घोषणा केली. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळण्यास ५ ते ६ जागा हव्या होत्या. भाजपाचे ४०, जेजेपीचे १० आणि ७ अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला.

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे वडील तुरूंगाबाहेर -

दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांची आज सकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. दोन आठवड्यांसाठी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना शिक्षक भरती घोटाळ्यात सापडल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात अजय चौटाला यांचे वडील ओमप्रकाश चौटाला यांच्यासह एकूण ५५ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पक्षाने १० जागा मिळवल्या आहेत.

manohar lal khattar took second time oath as chief minister of haryana

manohar lal khattar latest news, chief minister of haryana latest news, oath as cm of haryana news, मनोहर लाल खट्टर लेटेस्ट न्यूज, हरयाणाचे मुख्यमंत्री लेटेस्ट न्यूज

मनोहर लाल खट्टर यांनी घेतली मुख्य़मंत्रीपदाची शपथ

हरयाणा - भाजप-जेजेपी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज मनोहर लाल खट्टर यांनी हरयाणाच्या मुख्य़मंत्रीपदाची शपथ घेतली. तर, जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून शनिवारी एकमताने  मनोहर लाल खट्टर यांची निवड करण्यात आली होती. मनोहर लाल खट्टर यांना दुसऱ्यांदा मुख्य़मंत्रीपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या शपथविधी सोहळा चंदीगडच्या राजभवनात पार पडला.

हेही वाचा - 

शुक्रवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत चौटाला यांनी हरियाणामध्ये भाजपाला पाठिंबा देऊन युतीची घोषणा केली. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळण्यास ५ ते ६ जागा हव्या होत्या. भाजपाचे ४०, जेजेपीचे १० आणि ७ अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला.

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे वडील तुरूंगाबाहेर - 

दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांची आज सकाळी तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. दोन आठवड्यांसाठी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना शिक्षक भरती घोटाळ्यात सापडल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात अजय चौटाला यांचे वडील ओमप्रकाश चौटाला यांच्यासह एकूण ५५ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पक्षाने १० जागा मिळवल्या आहेत. 

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details