महाराष्ट्र

maharashtra

कॅबविरोधात पश्चिम बंगालमध्ये तोडफोड, आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा ममतांचा इशारा

By

Published : Dec 15, 2019, 8:07 AM IST

सरकारी मालमत्ता आणि नागरिकांच्या खासगी मालमत्तेची तोडफोड सहन केली जाणार नाही. आंदोलनादरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतुकीस अडथळा आणून लोकांसमोर समस्या उभ्या करू नका. कायदा हातामध्ये घेतल्यास संबधीत व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना दिला आहे

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

कोलकाता - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत ईशान्य भारतासह बंगालमध्ये देखील आंदोलन सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना राज्यात तोडफोड केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

सरकारी मालमत्ता आणि नागरिकांच्या खासगी मालमत्तेची तोडफोड सहन केली जाणार नाही. आंदोलनादरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतुकीस अडथळा आणून लोकांसमोर समस्या उभ्या करू नका. कायदा हातामध्ये घेतल्यास संबधीत व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना दिला आहे. तसेच आंदोलकांना शांततेने आणि लोकशाही पद्धतीने व्यक्त होण्याचे आवाहन त्यांनी केले. आसाममध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचे लोन पश्चिम बंगालमध्येही पोहोचले आहे. पश्‍चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये लोकांनी बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवले होते. त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आल्या होत्या. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
Intro:Body:



कॅबविरोधात राज्यात तोडफोड, ममता बॅनर्जींचा आंदोलकांना कठोर कारवाईचा ईशारा

कोलकाता -  नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत संपूर्ण ईशान्य भारतासह बंगालमध्ये देखील आंदोलन सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना तोडफोडीविरूद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.

 सरकारी मालमत्ता आणि नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचे तोडफोड सहन केली जाणार नाही. आंदोलनादरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतुकीस अडथळा आणून लोकांसमोर समस्या उभ्या करू नका. असे केल्यास संबधीत व्यक्तीवर कायदेशीरित्या कारवाई करण्यात येईल, असा ईशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकाना दिला आहे. तसेच  आंदोलकांना शांततेने आणि लोकशाही पद्धतीने व्यक्त होण्याचे आवाहन त्यांनी केले.  

आसाममध्ये सुरु झालेल्या  आंदोलनाचे लोण  पश्चिम बंगालमध्येही पोहोचले आहे.  पश्‍चिम बंगालमध्ये अनेक भागांमध्ये लोकांनी बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवले होते. त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आल्या होत्या. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे




Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details