महाराष्ट्र

maharashtra

बिहारमध्ये पुन्हा वज्रघात; एकूण २६ लोकांचा मृत्यू..

By

Published : Jul 2, 2020, 9:04 PM IST

या पार्श्वभूमीवर पाटणा, बेगुसराई, खागरिया, पूर्णीया, भोजपूर, वैशाली आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वीजा कोसळण्याची शक्यता आहे..

Lightning kills 26 in Bihar
बिहारमध्ये पुन्हा वज्रघात; एकूण २६ लोकांचा मृत्यू..

पाटणा : बिहारमध्ये पुन्हा एकदा वीज कोसळून सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळ्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पाटणा, बेगुसराई, खागरिया, पूर्णीया, भोजपूर, वैशाली आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वीजा कोसळण्याची शक्यता आहे.

आज नोंद झालेल्या २६ लोकांपैकी; समष्टीपूरमध्ये सात, पाटणामध्ये सहा, मोतीहारीमध्ये चार, कटिहारमध्ये तीन, शिवाहारमध्ये दोन आणि मधेपूरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यासोबतच, पूर्णीया आणि बेट्टियामध्ये दोन व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली.

यामध्ये बळी गेलेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यातच बिहारमध्ये वज्रघातात तब्बल १०५ लोकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यामध्ये बळी गेलेल्या मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली होती.

हेही वाचा :तीन मुलांसह महिलेने रेल्वेसमोर घेतली उडी; एक वर्षाचा चिमुरडा बचावला!

ABOUT THE AUTHOR

...view details