महाराष्ट्र

maharashtra

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची भाजपाकडून मागणी

By

Published : Dec 16, 2020, 5:33 PM IST

Updated : Dec 16, 2020, 5:45 PM IST

निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. ही टीम राज्यातील कायदा सुव्यवस्थेची पाहणी करणार असून केंद्राला अहवाल पाठवणार आहे. तर दुसरीकडे राजकीय हिंसा आणि कायदा व्यवस्थेबाबत राज्यपालाच्या अहवालानंतर भाजपाने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे.

कैलाश विजयवर्गीय
कैलाश विजयवर्गीय

इंदौर - पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. ही टीम राज्यातील कायदा सुव्यवस्थेची पाहणी करणार असून केंद्राला अहवाल पाठवणार आहे. तर दुसरीकडे राजकीय हिंसा आणि कायदा व्यवस्थेबाबत राज्यपालाच्या अहवालानंतर भाजपाने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांच्या सरकारचे भविष्य आता निवडणूक आयोग आणि कायदा व्यवस्थेबाबत राज्यपालांच्या अहवालावर अवंलबून आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांची खास मुलाखत

पश्चिम बंगालमधील हिंसा रोखण्यात यायला हवी. आगामी विधानसभा निवडणुका निष्पक्ष व्हायला हव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आज निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेली आहे. याचबरोबर राज्यपालही एक अहवाल राष्ट्रपतींना पाठवत आहेत, असे विजयवर्गीय यांनी सांगितले.

जे. पी नड्डा अन् कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक -

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यास जात असताना ताफ्यातील गाड्यांवर हल्ला झाला. याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगालमध्ये कार्यरत असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना माघारी केंद्रात बोलावले आहे. केंद्राने या तीन अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावून घेतले आहे.

हेही वाचा -सिंघु बॉर्डरवर पंजाबमधील शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

Last Updated :Dec 16, 2020, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details