महाराष्ट्र

maharashtra

छत्तीसगडमध्ये महानदीला महापूर; 20 गावे केली रिकामी, 30 गावांमध्ये अलर्ट

By

Published : Aug 31, 2020, 7:26 AM IST

जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरमकेला तहसील क्षेत्रातील जवळपास 30 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महानदीला पूर
महानदीला पूर

रायपूर - छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन रेस्क्यू दलासह पूर भागातील लोकांना सुरक्षीत स्थळी हलवत आहे. पूरामुळे बरमकेला तहसील क्षेत्रातील जवळपास 30 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून यातील 20 गावे रिकामी करण्यात आली आहेत.

महानदीला पूर आल्याने ग्रामीण भागांमध्ये पूरस्थिती

पावसामुळे शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच पूरग्रस्त गावांत प्रशासनाचे अधिकारी पोहोचले नाहीत. त्या गावांतील लोकांना शासकीय भवनामध्ये ठेवण्यात येत आहे. दरम्यान, महानदीवरील धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजुला असलेल्या गावातील पूर ओसरत आहे. पूरग्रस्त भागांचा पंचनामा करून अधिकारी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच देणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details