महाराष्ट्र

maharashtra

सोनीपतमध्ये वायू दलाच्या हेलिकॉप्टरचे रस्त्यावरच इमरजन्सी लँडींग

By

Published : Jun 26, 2020, 1:38 PM IST

आज (शुक्रवारी)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे यमुना पुलाजवळ रस्त्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. त्यानंतर पायलटने अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. जवळच असलेल्या हिंडन एयरबेसचे अधिकारी आणि मेकॅनिक घटनास्थळी पोहोचले.

emergency landing of helicopter  sonipat latest news  haryana latest news  air force helicopter news sonipat  हवाई दल हेलिकॉप्टर सोनीपत  सोनीपत लेटेस्ट न्यूज
सोनीपतमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे रस्त्यावरच इमरजन्सी लँडींग

चंदीगड -हरियाणातील सोनीपत येथे तांत्रिक बिघाडामुळे वायू दलाच्या हेलिकॉप्टरची रस्त्यावर इमरजन्सी लँडींग करण्यात आली. गाजियाबाद येथून कुंडलीला जाणाऱ्या रस्त्यावरील यमुना पुलाजवळ हे हेलिकॉप्टर उतरले. त्यामुळे जवळपास एक ते दीड तास वाहतुकीवर परिणाम झाला होता.

सोनीपतमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे रस्त्यावरच इमरजन्सी लँडींग

आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे यमुना पुलाजवळ रस्त्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. त्यानंतर पायलटने अधिकाऱ्यांना माहिती दिली. जवळच असलेल्या हिंडन एयरबेसचे अधिकारी आणि मेकॅनिक घटनास्थळी पोहोचले. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण भरले. जवळपास एक ते दीड तास हे हेलिकॉप्टर रस्त्यावर उभे होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली होती. मात्र, काही वेळानंतर वाहने दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details