महाराष्ट्र

maharashtra

'भाई राहुल गांधी से ना हो पाएगा',  दिग्दर्शक अनुराग कश्यपचे टि्वट

By

Published : Dec 22, 2019, 6:03 PM IST

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काँग्रेसकडून रविवारी होणारे प्रदर्शन रद्द करण्यात आल्यामुळे एका युजरने राहुल गांधींवर टीका केली होती. त्या युजरला अनुराग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपचे टि्वट
दिग्दर्शक अनुराग कश्यपचे टि्वट

नवी दिल्ली - दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या टि्वटमुळे नेहमची चर्चेमध्ये असतात. अनुराग सामाजिक मुद्द्यांवर टि्वटच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यांच्या एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काँग्रेसकडून रविवारी होणारे प्रदर्शन रद्द करण्यात आल्यामुळे एका युजरने राहुल गांधींवर टीका केली होती. त्या युजरला अनुराग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

रविवारी राजघाटावर प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नाही, हे फक्त कारण आहे. बरीच लोक कलम 144 लागू असूनही विरोध करत आहेत. रविवारच्या दिवशी तुम्ही राहुल गांधीकडून काम करण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकता?, असे टि्वट शिवम नावाच्या एका युजरने केले होते.
अनुराग कश्यप यांनी हे रिटि्वट करत युजरला सडेतोड उत्तर दिले. 'भावा राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही. त्यांना टोकियो किंवा सेऊलमध्येच राहायला सांग. येथे त्यांची गरज नाही', असे अनुराग यांनी म्हटले.
दरम्यान काँग्रेस पक्षाकडून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आज म्हणजेच रविवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात येणार होते. मात्र ते रद्द करून सोमवारी प्रदर्शन करण्यात येणार आहे. राजघाटावरील धरणे प्रदर्शनामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी होतील. हे प्रदर्शन दुपारी 2 वाजता सुरू होईल. तर रात्री 8 वाजता समाप्त होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

'भाई राहुल गांधी से ना हो पाएगा',  दिग्दर्शक अनुराग कश्यपचे टि्वट

नवी दिल्ली -  दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या टि्वटमुळे नेहमची चर्चेमध्ये असतात. अनुराग सामाजिक मुद्यांवर टि्वटच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यांच्या  एका ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काँग्रेसकडून रविवारी होणारे प्रदर्शन रद्द करण्यात आल्यामुळे एका युजरने राहुल गांधींवर टीका केली होती. त्या युजरला अनुराग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आयोजीत प्रदर्शन रद्द करण्यासाठी दिल्ली पोलीसांनी परवानगी दिली नाही, हे फक्त कारण आहे. बरीच लोक कलम 144 लागू असुनही विरोध करत आहेत. वास्तवामध्ये  रविवारच्या दिवशी तुम्ही राहुल गांधीकडून काम करण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकता?, असे टि्वट शिवम नावाच्या एका युजरने केले होते.

अनुराग कश्यप यांनी हे रिटि्वट करत युजरला सडेतोड उत्तर दिले. 'भावा राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही. त्यांना टोकियो किंवा सियोलमध्येच राहायला सांग. येथे त्यांची गरज नाही', असे अनुराग यांनी म्हटले.

दरम्यान काँग्रेस पक्षाकडून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आज म्हणजेच रविवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात येणार होते. मात्र ते रद्द करून सोमवारी प्रदर्शन करण्यात येणार आहे. राजघाटावरील धरणे प्रदर्शनामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते सहभागी होतील. हे प्रदर्शन दुपारी 2 वाजता सुरू होईल. तर रात्री 8 वाजता समाप्त होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details