महाराष्ट्र

maharashtra

'कोव्हॅक्सिन'च्या क्लिनिकल चाचणीसाठी हैदराबादमध्ये नोंदणी सुरू..

By

Published : Jul 7, 2020, 4:38 PM IST

भारत बायोटेक या कंपनीने कोरोनासाठी लस तयार केली होती. काही दिवसांपूर्वीच या लसीच्या मानवी चाचणीसाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयए) यांच्यासोबत भारत बायोटेक ने या लसीची निर्मिती केली आहे.

Bharat biotech begins registration for clinical trial of COVAXIN
'कोव्हॅक्सिन'च्या क्लिनिकल चाचणीसाठी हैदराबादमध्ये नोंदणी सुरू..

हैदराबाद : देशातील कोरोनाची पहिली लस 'कोव्हॅक्सिनच्या' क्लिनिकल ट्रायलसाठी हैदराबादमध्ये नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एनआयएमएस) या संस्थेमार्फत या चाचणीसाठी नमुने गोळा केले जात आहेत.

भारत बायोटेक या कंपनीने कोरोनासाठी लस तयार केली होती. काही दिवसांपूर्वीच या लसीच्या मानवी चाचणीसाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयए) यांच्यासोबत भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे.

यासाठीची मानवी चाचणी येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आयसीएमआरचा मानस आहे.

कोरोनासाठी जगभरात सध्या १४५हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ २० लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा :भारत-चीन सीमेवर हवाई दलाने केले सर्वेक्षण..

ABOUT THE AUTHOR

...view details