महाराष्ट्र

maharashtra

पाकव्याप्त काश्मीरात नागरिक रस्त्यावर; चीन अनधिकृत धरणं बांधत असल्याने नोंदवला निषेध

By

Published : Jul 7, 2020, 12:31 PM IST

Updated : Jul 7, 2020, 3:31 PM IST

पाकव्याप्त काश्मीरातून वाहणाऱ्या नद्यांवर अनधिकृतरित्या धरणे बांधत असल्याने स्थानिकांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला. यासाठी चीनविरोधात घोषणाबाजी करत मोठी रॅली काढण्यात आली. निलम आणि झेलम नद्यांवर हे बांधकाम करण्यात येत आहे. संबंधित धरणं बांधल्याने पर्यावरणीय बदल होणार आहेत. त्यावर आंदोलनकर्त्यांनी दोन्ही देशांचे लक्ष वेधले.

Anti-China protests held in PoK
पाकव्याप्त काश्मिरातून वाहणाऱ्या नद्यांवर अनधिकृतरित्या धरणे बांधत असल्याने स्थानिकांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला.

मुझफ्फराबाद(पीओके) - पाकव्याप्त काश्मिरातून वाहणाऱ्या नद्यांवर अनधिकृतरित्या धरणे बांधत असल्याने स्थानिकांनी रस्त्यावर उतरत चीनचा निषेध नोंदवला. यासाठी चीनविरोधात घोषणाबाजी करत मोठी रॅली काढण्यात आली. निलम आणि झेलम नद्यांवर हे बांधकाम करण्यात येत आहे. संबंधित धरणं बांधल्याने पर्यावरणीय बदल होणार आहेत. त्यावर आंदोलनकर्त्यांनी दोन्ही देशांचे लक्ष वेधले. पाकिस्तान आणि चीन दोन्ही देशांच्या पुढाकाराने या नद्यांवर धरणांचे बांधकाम सुरू आहे. त्याविरोधात स्थानिकांनी आवाज उठवलाय.

पाकव्याप्त काश्मिरातून वाहणाऱ्या नद्यांवर अनधिकृतरित्या धरणे बांधत असल्याने स्थानिकांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला.

चीन सरकारने अनधिकृतपणे बांधलेल्या धरणांविरोधात आज पाकिस्तानव्याप्त काश्मीरात संघर्ष पाहायला मिळाला. चीन सरकारने निलम आणि झेलम आणि कोहला जलविद्युत केंद्रांचे प्रकल्प उभारले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय बदलांना समोरे जावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

जागतिक स्तरावर याचा प्रभाव पाडण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी #SaveRiversSaveAJK नावाचा हॅशटॅग सुरू केलाय. यामार्फत संबंधित विषयावर आंतराष्ट्रीय स्तराव आवाज उठवण्यात येत असून पाकिस्तान आणि चीनच्या धोरणांचा विरोध करण्यात आला.

पाक व्याप्त काश्मीर हा विवादीत प्रदेश असून पाकिस्तान आणि चीनने कोणत्या कराराद्वारे या प्रकल्पांना सुरुवात केली, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना पायदळी तूडवत दोन्ही देशांनी नद्यांवर मालकी गाजवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Last Updated :Jul 7, 2020, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details