महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा बंगाल दौरा रद्द

By

Published : Jan 30, 2021, 12:23 AM IST

शुक्रवारी(29 जानेवारी) दिल्ली झालेल्या स्फोटामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. अमित शाह हे शुक्रवारी रात्री कोलकाता येथे येणार होते.

Amit Shah
गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली -शुक्रवारी(29 जानेवारी) दिल्ली झालेल्या स्फोटामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. अमित शाह हे शुक्रवारी रात्री कोलकाता येथे येणार होते. तर, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शाह हे पश्चिम बंगालच्या दौऱयावर येणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

दोन दिवसाच्या पश्चिम बंगालच्या दौऱयावर येणार होते अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 30 आणि 31 जानेवारी असे दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱयावर येणार होते. कोलकाता येथील भाजपच्या अनेक नियोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा दौरा हा रद्द झाला आहे.

इस्रायली दूतावासाबाहेर झाला स्फोट -

मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटाची तीव्रता कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आयईडीच्या स्वरुपातील ही स्फोटके प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून फुटपाथवर ठेवली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या तीन ते चार गाडयांच्या काचा फुटल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details