महाराष्ट्र

maharashtra

भारत जोडो न्याय यात्रेचा आज तिसरा दिवस, राहुल गांधींचं नागालॅंडमध्ये नागरिकांकडून स्वागत

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 11:57 AM IST

Updated : Jan 16, 2024, 12:04 PM IST

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज तीसरा दिवस आहे. आज मंगळवार (16 जानेवारी)रोजी सकाळी ही यात्रा नागालँडची राजधानी कोहिमाच्या विश्वेमा भागातून सुरू झाली. राहुल गांधी काल सोमवार संध्याकाळी नागालँडला पोहोचले होते. आज सकाळी राहुल यांनी स्थानिक लोकांची भेट घेतली. त्यानंतर पुढील यात्रेला सुरूवात झाली.

Bharat Jodo Nyaya Yatra
भारत जोडो न्याय यात्रेचा आज तीसरा दिवस

कोहिमा (नागालँड) :Bharat Jodo Nyaya Yatra : कोहिमा येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा पुढील प्रवासाला सुरू झाली. यावेळी राहुल गांधी यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यावेळी मोठ्या संख्यने नागरिक राहुल गांधे यांचे हार, फुल देऊन स्वागत केले. तसेच, राहुल गांधी यांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेली त्यांनी केंद्र सरकावर जोरदार जोरदार हल्ला चढवला. जयराम रमेश म्हणाले," ज्या मार्गे यात्रा जात आहे तो राष्ट्रीय महामार्ग 29 आहे. परंतु, त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खूप बोलतात. पण या रस्त्यावर फक्त खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे का, असा उलट प्रश्नही रमेश यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.

ते आम्ही येथे परत आणू : या भारत जोडो न्याय यात्रेचा हा 66 दिवसांचा बस आणि पायी प्रवास आहे. 100 लोकसभा मतदारसंघ आणि 15 राज्यांतील 337 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. यापूर्वी राहुल गांधींनी (सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023)या कालावधीत कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो यात्रा' काढली होती. यापूर्वी मणिपूरची राजधानी इंफाळजवळील थौबल येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "मणिपूरमध्ये जे दुःख आहे ते आम्हाला समजलं आहे. आम्ही वचन देतो की, येथे शांतता, प्रेम, एकतेसाठी हे राज्य ओळखले जाते. ते आम्ही येथे परत आणू" असही ते म्हणाले.

आठ महिन्यांपासून गप्प का ? : मणिपूरमध्ये आठ महिन्यांहून अधिक काळ मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस मणिपूरमधील परिस्थितीसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "पंतप्रधान आठ महिन्यांपासून गप्प का आहेत? तासभरही ते इंफाळला आलेले नाहीत"

त्यावर नक्की बोलतील : पहिल्या यात्रेनx राहुल गांधींची प्रतिमा सुधारली. त्यांचा राजकीय दर्जाही सुधारल्याचं लक्षात अल्यानं काँग्रेसकडून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधींचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्या मैबाम शारदा लैमा म्हणाल्या, "आमचे मणिपूर जळत आहे. आम्हाला आशा आहे की राहुल गांधी आमच्या समस्या जाणून घेतील. पाहतील आणि त्यावर नक्की बोलतील".

हेही वाचा :

1'एनडीए'मध्ये प्रकाश आंबेडकर आले तर मी मंत्रिपद सोडेल - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

2मिलिंद देवरा यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीवर परिणाम होणार का?

3शेतकरी आंदोलन पुन्हा सुरू होणार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चाची घोषण

Last Updated :Jan 16, 2024, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details