महाराष्ट्र

maharashtra

Baramulla Attack : काश्मीरमध्ये हेड कॉन्स्टेबलची हत्या, तीन दिवसातील तिसरा हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 9:50 PM IST

Baramulla Attack : मंगळवारी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस हेड कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. सोमवारी अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यात एका स्थलांतरित मजुराची हत्या केली होती. तर रविवारी श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

Baramulla Attack
Baramulla Attack

बारामुल्ला Baramulla Attack :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचं सत्र सुरूच आहे. मंगळवारी (३१ ऑक्टोबर) उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील तंगमार्ग गावात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. वाईलू गावातील हेड कॉन्स्टेबल गुलाम मोहम्मद दार यांना त्यांच्या राहत्या घराजवळ गोळ्या घालण्यात आल्या. गेल्या तीन दिवसातील अशाप्रकारची ही तिसरी घटना आहे.

पोलिसांकडून शोध मोहीम सुरू : घटनेनंतर कॉन्स्टेबलला लगेचच जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. 'अतिरेकी हल्ल्यात जखमी पोलीस कर्मचारी शहीद झाला. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या गंभीर प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे', असं काश्मीर झोन पोलिसांनी 'X' वर पोस्ट केलं.

तीन दिवसातील तिसरी घटना : सोमवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अज्ञात अतिरेक्यांनी एका स्थलांतरीत मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या एक दिवस आधी, दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका निरीक्षकाला श्रीनगरमधील त्याच्या घराजवळ क्रिकेट खेळत असताना गोळ्या घातल्या होत्या. शेवटच्या वृत्तानुसार, या पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

डीजीपीचं वक्तव्य : जम्मू आणि काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी अलीकडेच हा प्रदेश शांततेच्या मार्गावर येत असल्याचं सांगितलं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद 'जवळजवळ संपला', असं ते म्हणाले होते. डीजीपी म्हणाले होते की, २०२३ मध्ये केवळ १० स्थानिक तरुण दहशतवादी गटात सामील झाले. एका वर्षापूर्वी ही संख्या ११० होती.

हेही वाचा :

  1. Pulwama Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग, स्थलांतरित मजुराची हत्या केली

ABOUT THE AUTHOR

...view details