महाराष्ट्र

maharashtra

ASHISH MISHRA ARREST युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

By

Published : Oct 9, 2021, 11:20 PM IST

Updated : Oct 10, 2021, 2:16 AM IST

२१ तास पोलिसांनी आशिष मिश्राची चौकशी केली. मात्र, तपासात सहकार्य केले जात नसल्याने आणि काही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने अटक करण्यात आल्याचे सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ASHISH MISHRA ARREST
ASHISH MISHRA ARREST

लखनौ- लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मोठी बातमी आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्राला शनिवारी अटक करण्यात आली आहे.

आशिष मिश्राची पोलिसांनी सुमारे १२ तास चौकशी केली. मात्र, तपासात सहकार्य केले जात नसल्याने आणि काही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने अटक करण्यात आल्याचे सहारनपूरचे डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाची डीआयजी उपेंद्र अग्रवाल हे चौकशी करत आहेत. त्यांच्या माहितीनुसार दिवसभर चौकशी केल्यानंतर आशिष मिश्राला रात्री १० वाजून ४० मिनिटाला अटक करण्यात आली.

युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाला अटक

संबंधित बातमी वाचा-मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवार व FIR दाखल न करता 28 तास कोठडीत ठेवले - प्रियंका गांधी

अटकेपर्यंत काय घडले आहे नाट्य?

  • आशिष मिश्राला शनिवारी सकाळी १० वाजून ४१ मिनिटाला गुपचूपणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात गुपचूपपणे आणण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यालयाचे दरवाजे बंद केले होते. डीआयजी उपेंद्र अग्रवाल आणि पोलीस अधीक्षक विजय ढोल आणि आयपीएस सुनील कुमार सिंह यांच्यासमवेत ९ जणांच्या पथकाने आशिष मिश्राची चौकशी केली.
  • लखीमपूरमधील हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा पुत्र आशिष मिश्रा हा शनिवारी पोलिसांसमोर हजर झाला होता. मागील ८ ऑक्टोबरलाच मिश्रा पोलिसांसमोर हजर होणे अपेक्षित होते. मात्र, मिश्रा वेळेवर हजर झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्या हजर राहण्याची वाट पाहावी लागली होती.
  • दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेदेखील उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आशिष मिश्रा हे पोलिसांसमोर हजर झाले होते.
  • ३ ऑक्टोबरला लखीमपूर खिरी येथे एका वाहनाने चिरडल्याने ३ शेतकरी, एक पत्रकार आणि ३ भाजपचे कार्यकर्ते व मंत्र्याच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शेतकरी जगजीत सिंह यांनी ४ ऑक्टोबरला पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आशिष मिश्रावर ३०२ आणि ३०४ हे गंभीर गुन्हे दाखल केले होते.
  • आरोपींना अटक करण्यात आले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी ७ ऑक्टोबरला केंद्रीय गृह राज्यमंत्री अज मिश्रा टेनी यांच्या घराबाहेर समन्स लावले होते.
  • लखीमपूर प्रकरणात महाधिवक्ता हरीश साळवे यांनी आरोपी मिश्रा हा ११ वाजता पोलिसांसमोर हजर राहिल, याची सर्वोच्च न्यायालयात खात्री दिली होती.

संबंधित बातमी वाचा-LAKHMIPUR केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करा- राकेश टिकैतांचा योगी सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम

आशिष मिश्राच्या समर्थकांचा गोंधळ

आशिष मिश्रा हा गुन्हे शाखेत पोहोचल्यानंतर समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. आशिष मिश्राच्या अटकेनंतर त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यासही सुरुवात केली होती. त्यावर मंत्री अजय मिश्राच्या समर्थकांनी शांततेचे आवाहन केले होते. आशिष मिश्रासमवेत आमदार योगेश वर्मा आणि खासदार संजय सिंह हे उपस्थित होते.

संबंधित बातमी वाचा-माझ्यावर राजीनाम्याचा कोणताही दबाव नाही; अजय मिश्रा तेनी यांची प्रतिक्रिया

Last Updated :Oct 10, 2021, 2:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details