महाराष्ट्र

maharashtra

Destroyed Camp of Naga Militants : अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त; मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त

By

Published : Feb 23, 2023, 10:45 PM IST

अरुणाचल प्रदेश पोलिसांनी आज चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईचे नेतृत्व चांगलांग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मिहीन गंबू आणि अरुणाचल प्रदेश विशेष तपास पथकाचे एसआयटी अधीक्षक रोहित राजीव सिंग यांनी केले. हा प्रदेश प्रामुख्याने भारत-म्यानमार सीमेवर आहे.

Destroyed Camp of Naga Militants
अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त

तेजपूर/अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेश पोलिसांनी काल रिमा पुटोकच्या लुंगपांग भागात बंडखोर ईस्टर्न नागा नॅशनल गव्हर्नमेंट (ईएनएनजी) च्या छावणीवर कब्जा केल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू केली. भारत-म्यानमार सीमेजवळ चांगलांगमधील वर्तुळ म्हणजेच नागा अतिरेक्यांचा तळ जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करीत जोरदार हल्ला चढवून तो तळ उद्ध्वस्त केला.

अरुणाचल पोलिसांकडून मोठी कारवाई :बुधवारी परिसरात पाच संशयित बंडखोर दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली, असे चांगलांग जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी छावणीवर हल्ला केल्यानंतर बंडखोरांना माघार घ्यावी लागली. त्यांनी सांगितले की, कारवाईमध्ये छावणीत सापडलेली शस्त्रे आणि दारूगोळा ऑपरेशन थांबवताच सर्व ताब्यात घेण्यात आले. त्याला आम्ही शासकीय जबाबदारीनुसार सील करून ठेवले आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तिथे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर मोठा दारूगोळा सापडला असल्याचे सांगितले

अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त
अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त

मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे-दारूगोळा जप्त :पोलिसांनी एक AK-47 रायफल, एक M16 रायफल, हँड ग्रेनेड - 1, एके 47 7.62 मिमी राऊंड - 104, 5.56 मिमी गोळ्या - 23 राउंड, एके 47 7.62 मिमी दारूगोळा मॅगझिन - 4.7 एमएम - 4.7 एमएम, मॅगझिन जप्त केली. संपर्कासाठी वापरले जाणारे धारदार शस्त्र, डब्ल्यूटी सेट आणि चार्जर - 1 संच, अँथनी टायडोंग याच्या नावाचे पॅन कार्ड - 1 अशा प्रकारचे शस्त्रास्त्रे पोलिसांना यामध्ये सापडल्याचे सांगितले. पोलिसांनी संस्थेची वन रँक कॅप आणि 20 नंबर लाइटर जप्त केले आणि कॅम्पही जाळला आणि पोलिसांच्या पथकाने छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. घटनास्थळाची योग्य छायाचित्रण आणि व्हिडीओग्राफी पोलिसांनी जपून ठेवली होती. अरुणाचल प्रदेश पोलिसांनी केलेली बंडखोरीविरोधी ही पहिलीच कारवाई आहे.

अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त

हेही वाचा : Black Magic in Boriwali : बोरिवलीतील इमारतीत अंधश्रद्धेचे प्रकार? दक्ष रहिवाशांची कारवाईची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details