महाराष्ट्र

maharashtra

Amritpal Singh: अमृतपाल सिंगला देशातील सर्वात सुरक्षित दिब्रुगढ जेलमध्ये ठेवणार, ब्लॅक पँथर कमांडोंची असणार नजर

By

Published : Apr 23, 2023, 11:04 AM IST

खलिस्तान समर्थक अमृतपाल याने आज सकाळी पंजाबमधील मोगा येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पंजाब पोलीस त्याला अमृतसरला घेऊन जाणार असून, तेथून त्याला आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार आहे. जाणून घ्या डिब्रुगड सेंट्रल जेल का आहे खास..

DIBRUGARH CENTRAL JAIL
दिब्रुगढ जेल

नवी दिल्ली :रविवारी पंजाबमधील मोगा येथून अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली. पंजाब पोलीस त्याला तेथून अमृतसरला घेऊन जात असून, तेथून त्याला विमानाने आसाममधील दिब्रुगडला नेण्यात येणार आहे. अमृतपाल सिंग यांना दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. हे उच्च सुरक्षा कारागृह आहे. या कारागृहात यापूर्वी त्याचे सहकारी आणि समर्थकही ठेवण्यात आले आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या समर्थकांना किंवा साथीदारांना तेथे एकमेकांना किंवा अन्य कैद्यांना भेटू दिले जात नाही.

उल्फाच्या अतिरेक्यांनाही ठेवले होते या तुरुंगात:वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्यांचे काका हरजीत सिंग यांच्या सात निकटवर्तीयांना आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. या सर्वांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिब्रुगड तुरुंगाची जोरदार तटबंदी करण्यात आली आहे. आसाममध्ये उल्फा दहशतवादाच्या शिखरावर असताना, अटकेनंतर या तुरुंगात प्रमुख दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. दिब्रुगढ मध्यवर्ती कारागृह हे केवळ आसाम राज्यातच नाही तर देशातील गुन्हेगारांसाठी अत्यंत वाईट तुरुंग म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे ईशान्य भारतातील सर्वात जुन्या तुरुंगांपैकी एक तुरुंग आहे.

ब्लॅक पॅन्थर कमांडो तैनात:सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारागृहात बहुस्तरीय पाळत ठेवण्यात आली आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. याशिवाय उच्च दर्जाचे जॅमर लावण्यात आले आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे कोणत्याही कैद्याला कारागृहातून पळून जाणे अवघड झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपाल देखील याच तुरुंगात असल्याने दिब्रुगड तुरुंगाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारागृहाभोवती बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसाम पोलिसांच्या बंडखोरीविरोधी विशेष दलाचे ब्लॅक पँथर कमांडो तुरुंगात तैनात करण्यात आले आहेत. देशातील सर्वात कडक पाळत ठेवणारे कमांडो मानले जातात. खलिस्तान चळवळीत काम करणाऱ्यांविरोधात कारवाई केल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिंमत सर्मा यांनी यापूर्वीच आपचे संस्थापक अरविंत केजरीवाल यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: अमृतपाल सिंग पाच महिन्यांपासून करत होता प्लॅन

ABOUT THE AUTHOR

...view details