महाराष्ट्र

maharashtra

CORONA RESTRICTIONS FREE MP कोरोनाच्या काळातील सर्व निर्बंध मागे- मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची घोषणा

By

Published : Nov 17, 2021, 7:50 PM IST

Updated : Nov 17, 2021, 8:29 PM IST

मध्य प्रदेशने कोरोनाच्या काळातील सर्व निर्बंध हटविले आहेत. हा निर्णय घेणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असणार आहे.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची घोषणा
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची घोषणा

भोपाळ- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान (Chief Minister shivraj singh chauhan) यांनी कोरोनाच्या काळातील सर्व बंधने (all corona restrictions removed from MP ) हटविले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराज यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या काळातील निर्बंध हटविण्यात आले असले तरी कोरोना लसीकरणाचे नियम लागू असणार आहेत. हॉस्टेलमधील 18 वर्षांहून अधिक वयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोरोनाचे दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे. चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनाही दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, खेळ-मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक-आयोजन 100 टक्के क्षमतेने करता येणार आहे. मात्र, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे (social distancing) पालन करण्याची गरज आहे.

हेही वाचा-VIDEO भाषण देत असताना हृदयविकाराच्या झटक्याने स्वामीजींचा मृत्यू

100 टक्के निर्बंध मागे घेतल्याने काय होणार?

  • मध्य प्रदेशमध्ये 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल खुले होणार
  • सामाजिक, राजकीय, खेळ-मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक आयोजनाकरिता पूर्ण परवानगी
  • सर्व प्रकारच्या कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी
  • विवाह आणि अंतिमसंस्काराच्या वेळी पूर्ण क्षमतेने नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी
  • सिनेमा हॉल, मॉल, स्विमिंग पूल, जिम, योग सेंटर, रेस्टॉरंट, क्लब हे 100 टक्के क्षमतेने सुरू होऊ शकणार
  • सर्व हॉस्टेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी

हेही वाचा-अबब... चक्क 117 चालान, अखेर मोस्ट वॉंडेट मोपेड चालकाला गाडीसह पकडले

महाराष्ट्रातही कोरोनाचे प्रमाण कमी

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. 15 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 686 रुग्ण आढळून आले आहेत. या आधी 6 नोव्हेंबरला 661 तर 8 नोव्हेंबरला 751 रुग्ण आढळून आले होते. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 912 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

Last Updated :Nov 17, 2021, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details