महाराष्ट्र

maharashtra

NO vaccination no alcohol कोरोनाचे दोन डोस घ्या, मग दारू ढोसा- 'या' राज्यात उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

By

Published : Nov 18, 2021, 8:57 PM IST

खंडवा उत्पादन शुल्क विभागाचे ( Khandwa Excise Department)अधिकारी म्हणाले, की कोरोना लशींचे डोस घेतले नाही तर त्यांना दारू मिळणार नाही. दारू विक्रेत्यांना ग्राहकांचे कोरोना प्रमाणपत्र पाहूनच दारू विकावी लागणार आहे. ग्राहकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याची दारू विक्रेत्यांना खात्री करावी लागणार आहे.

मध्य प्रदेश कोरोना लसीकरण
मध्य प्रदेश कोरोना लसीकरण

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये कोरोना लसीकरणाचे (madhya pradesh vaccination drive) प्रमाण वाढविण्यासाठी खंडवा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या व्यक्तींनी लशींचे दोन डोस (coronas two doses) घेतले आहेत, त्यांनाच दारू विक्री करावी, असे आदेश उत्पादन शुल्काने विभागाने दारू विक्रेत्यांना दिले आहेत.

खंडवा उत्पादन शुल्क विभागाचे ( Khandwa Excise Department)अधिकारी म्हणाले, की कोरोना लशींचे डोस घेतले नाही तर त्यांना दारू मिळणार नाही. दारू विक्रेत्यांना ग्राहकांचे कोरोना प्रमाणपत्र पाहूनच दारू विकावी लागणार आहे. ग्राहकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याची दारू विक्रेत्यांना खात्री करावी लागणार आहे. खंडवा जिल्ह्यात 56 देशी आणि 19 विदेशी दारूची दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे नियम लागू होणार आहेत.

हेही वाचा-pushkar cattle fair : 'भीम' आहे तब्बल 24 कोटींचा रेडा

जलमहोत्सवात कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना प्रवेश-

नर्मदा बॅकवॉटरमध्ये पर्यटन विभागाकडून हनुवंतिया भागात 6 वा जलमहोत्सव सुरू होणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते जलमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जलमहोत्सवाची (Jalmahotsav in Madhya Pradesh) संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच महोत्सवात प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा-'पद्मश्री'साठी कंगना रणौतने कोणाकोणाचे तळवे चाटले? कृपाल तुमानेंचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details