महाराष्ट्र

maharashtra

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती, देशभरात 'हा' दिवस म्हणून होतोय साजरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 9:56 AM IST

Dr Rajendra prasad Birth Anniversary : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती देशभरात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. देशाची राज्यघटना तयार करण्यात तसंच शेतीचं नियोजन आणि विकास करण्यात डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

Dr Rajendra prasad Birth Anniversary
डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती

हैदराबाद Dr Rajendra prasad Birth Anniversary :3 डिसेंबर 1884 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म बिहारमधील जिरादेई येथे झाला. डॉ. प्रसाद हे भारताचे पहिले कृषी मंत्रीदेखील होते. कृषी विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेनं त्यांचा वाढदिवस कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. देशाच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राच्या विविध पैलूंची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी, जेणेकरून तेही कृषी क्षेत्रात आपलं अमूल्य योगदान देऊ शकतील, हा या दिवसाचा उद्देश आहे.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनावर एक नजर :

  1. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सारण (सिवान) जिल्ह्यातील जिरादेई येथे झाला.
  2. डॉ. प्रसाद हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निकटचे सहकारी होते.
  3. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली.
  4. डॉ. प्रसाद यांनी कलकत्ता विद्यापीठातून शिक्षण घेतलं.
  5. सुरुवातीला त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात कारकीर्द सुरू केली.
  6. ते त्यांच्या उत्कृष्ट कायदेशीर कौशल्यासाठी प्रसिद्ध होते.
  7. 1906 मध्ये बिहारी विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेत डॉ. प्रसाद सक्रिय होते.
  8. 1915 साली, डॉ. प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले.
  9. 11 डिसेंबर 1946 रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  10. डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
  11. 26 जानेवारी 1950 रोजी ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  12. डॉ. प्रसाद यांनी संविधान सभेच्या अन्न आणि कृषी समितीचे अध्यक्षपद भूषवले. 13 मे 1962 पर्यंत ते अन्न आणि कृषी समितीचे अध्यक्ष होते.
  13. 1962 मध्ये त्यांना भारत सरकारनं भारतरत्न देऊन सन्मानित केलं.
  14. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली अन् आपल उर्वरित आयुष्य पाटणा येथील सदाकत आश्रमात व्यतीत केलं.
  15. 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचे निधन झाले.
  16. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती वकील दिन म्हणूनदेखील साजरी केली जाते.
  • नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (The National Institutional Ranking Framework-NIRF) हे रँकिंग भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केलं जातं. यात देशातील प्राध्यापकनिहाय विद्यापीठांची क्रमवारी विहित मानकांच्या आधारे जाहीर केली जाते.

भारतातील टॉप 5 एग्रीक्लचर यूनिवर्सिटी 2023

  1. भारतीय कृषी संशोधन संस्था (नवी दिल्ली) - 83.16
  2. नॅशनल डेअरी रिसर्च- आईसीएआर (हरियाणा) - 70.45
  3. पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना (पंजाब) - 65.98
  4. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी (उत्तर प्रदेश) -63.68
  5. तामिळनाडू कृषी विद्यापीठ कोईम्बतूर (तामिळनाडू) -61.71

हेही वाचा -

  1. संविधानाच्या बांधणीत डॉ. राजेंद्र प्रसादांचे योगदान..
  2. Republic Day : 26 जानेवारीलाच 'प्रजासत्ताक दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती
  3. Rajendra Prasad Death Anniversary: देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज पुण्यतिथी; संविधानाच्या बांधणीत आहे महत्त्वाचे योगदान

ABOUT THE AUTHOR

...view details