महाराष्ट्र

maharashtra

'... तर तालिबानसोबत भारताने राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे'; माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा सल्ला

By

Published : Aug 19, 2021, 11:49 AM IST

सध्या भारत सरकारने सध्या अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण परिस्थितीवर माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी आपले मत मांडले आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये जबाबदार सरकारसारखे वागत असेल, तर भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत, असे ते म्हणाले.

natwar singh
नटवर सिंह

नवी दिल्ली -भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आतापर्यंतच चांगले द्विपक्षीय संबंध होते. मात्र, आता तालिबानी हातात सत्ता गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. इतिहास पाहिला तर भारतासोबत तालिबान्यांचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत. सध्या भारत सरकारने सध्या अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण परिस्थितीवर माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी आपले मत मांडले आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये जबाबदार सरकारसारखे वागत असेल तर भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत, असे ते म्हणाले.

यूपीए-1 सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले नटवर सिंह यांनी अनेक वरिष्ठ राजनैतिक पदांसह पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. तालिबान युद्धग्रस्त देशात विकासात्मक आणि जबाबदार सरकार म्हणून काम करत असेल. तर त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मी समर्थन करतो.

सत्ता काबीज करणारे तालिबानी सक्षम -

भारताने सध्या 'पाहणे आणि प्रतीक्षा करणे' (wait and watch) धोरण स्वीकारावे. गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्यांपेक्षा सत्ता काबीज करणारे तालिबानी सक्षम दिसतात, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताचे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. मात्र, आता त्यांच्या हाती सत्ता नसून परिस्थिती खूप वेगाने बदलली आहे, असे नटवर सिंह म्हणाले.

भारताची अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक -

परिस्थिती पूर्णपणे भारताच्या विरोधात नाही. फक्त मैत्रीची एक झलक नाहीशी झाली आहे. यामुळेच भारत सरकार अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. 'मी परराष्ट्रमंत्री असतो तर मी त्यांच्याशी संपर्क साधला असता. मी माझ्या मार्गाने गेलो असतो आणि माझ्या गुप्तचर संस्थेला शांतपणे त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले असते. कारण, पाकिस्तान आणि चीनसाठी खुले मैदान सोडू शकत नाही. भारताने तालिबानशी किमान परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर उघडपणे संवाद साधायला हवा होता. हे खरे आहे, की ते पाकिस्तानच्या अधिक जवळ आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही, की इस्लामाबाद त्यांना त्यांच्या स्वत: च्या अटींवर चालवू शकतो, असे नटवरलाल म्हणाले. तसेच भारताने अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे सिंह यांनी नमूद केले.

हेही वाचा -Sher Mohammad Abbas Stanekzai: तालिबानच्या प्रमुख नेत्याचे उत्तराखंडच्या भारतीय लष्करी अकादमीशी जुने संबंध

हेही वाचा -'...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; अफगाण तालिबानचा भारताला इशारा

हेही वाचा -धक्कादायक! ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याचे तालिबानला समर्थन

हेही वाचा -VIDEO : काबूल विमानतळावरील 'तो' थरार अन् गोंधळ ऐका प्रत्यक्षदर्शी डॉ. पराग रबडे यांच्या तोंडून

हेही वाचा -ही आहे महाराष्ट्राची "निरजा", अमरावतीच्या या लेकीने 129 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणले

ABOUT THE AUTHOR

...view details