महाराष्ट्र

maharashtra

Himachal Election 2022 : हिमाचलच्या जनतेने 'आप'चा तिसरा पर्याय नाकारला, सर्व 67 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

By

Published : Dec 9, 2022, 3:57 PM IST

आपने सत्येंद्र जैन यांना हिमाचलचे प्रभारी बनवले होते. मात्र आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हिमाचलला पूर्ण वेळ दिला नाही. अशाप्रकारे निवडणुकीपूर्वीच पक्षाने येथे आपला पराभव स्वीकारल्याचे दिसून आले. (AAP in Himachal) (AAP performance in Himachal election)

Etv Bharat
Etv Bharat

शिमला : हिमाचल निवडणुकीत (Himachal Election 2022) तिसरा पर्याय जनतेने नाकारला आहे. हिमाचलमध्ये आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) हा तिसरा पर्याय म्हणून समोर येऊ शकतो असे बोलले जात होते. पक्षाने 67 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. (AAP in Himachal). मात्र पक्षाला येथे एकही जागा जिंकता आली नाही. एवढेच नव्हे तर आपच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. अशाप्रकारे 'आप' हिमाचलमध्ये तिसरा असू शकतो या दाव्यातील सारी हवाच निघून गेली. (AAP performance in Himachal election)

हिमाचल ऐवजी गुजरातवर अधिक लक्ष केंद्रित : आपने सत्येंद्र जैन यांना हिमाचलचे पक्ष प्रभारी बनवले होते. मात्र आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हिमाचलला पूर्ण वेळ दिला नाही. अशाप्रकारे निवडणुकीपूर्वीच पक्षाने येथे आपला पराभव स्वीकारल्याचे दिसून आले. दुसरीकडे दिल्ली आणि पंजाबमध्ये विक्रमी विजय मिळवणाऱ्या आपच्या उमेदवारांची हिमाचलमध्ये मात्र अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 'आप'ने निवडणुकीत हिमाचल ऐवजी गुजरातवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. आम आदमी पक्षाला उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गोव्यात आपले खातेही उघडता आले नाही. विशेषत: हिमाचल आणि उत्तराखंडची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती जुळते तेथे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरवला होता.

रोड शो अर्ध्यातच सोडावा लागला : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याच्या एका दिवसानंतर रोड शो केला. या रोड शोमध्ये पंजाबच्या शिक्षकांनी विरोध केल्याने अरविंद केजरीवाल यांना रोड शो सोडावा लागला. यानंतर अरविंद केजरीवाल हिमाचल दौऱ्यावर आले नाहीत. मात्र, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अरविंद केजरीवाल ते भगवंत मान आणि मनीष सिसोदिया यांनी हिमाचलमध्ये अनेक दौरे केले आणि रॅली, रोड शो केले आणि जनतेशी थेट संवाद साधला. त्यानंतर आम आदमी पक्षाने सत्येंद्र जैन यांना हिमाचलचे प्रभारी बनवले होते.

पक्षाने केल्या होत्या अनेक मोठ्या घोषणा :आम आदमी पक्षाने हिमाचलमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. मोफत सुविधा देण्याबरोबरंच शाळा, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी पावले उचलण्यासाठी पक्षाने अनेक घोषणा केल्या. मात्र हिमाचलच्या जनतेने या निवडणुकीत त्यांना साफ नाकारले. हिमाचलमध्ये आम आदमी पक्षाने दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसप्रमाणेच हिमाचलमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सरकार स्थापन होताच जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याची घोषणा केली होती. बेरोजगार तरुणांना मासिक 3000 बेरोजगार भत्ता आणि 18 ते 60 वयोगटातील महिलांना 1000 रुपये भत्ता देण्याचे आश्वासनही दिले होते. याशिवाय वीज, पाणी, शेतकरी, बागायतदारांना योग्य आधारभूत किंमत देण्याची हमीही देण्यात आली. पक्षाने हिमाचलमध्ये दिलेल्या या आश्वासनांना केजरीवालांची हमी असे नाव दिले. पण हिमाचलच्या जनतेने या हमी नाकारल्या.

आतापर्यंत अनेक पक्षांचे प्रयत्न अयशस्वी : कम्युनिस्टांपासून बसपापर्यंत, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाने हिमाचल प्रदेशमध्ये तिसरा पर्याय म्हणून समोर यायचा प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि तीन वेळा लोकसभेचे खासदार असलेले हिमाचलचे नेते महेश्वर सिंह यांनी २०१२ मध्ये पक्षापासून फारकत घेऊन हिमाचल लोकहित पार्टीची स्थापना केली. परंतु २०१२ च्या निवडणुकीत ते एकमेव आमदार म्हणून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. त्यांचा पक्ष 2017 मध्ये भाजपमध्ये विलीन झाला. मात्र, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे तगडे नेते पंडित सुख राम यांनी हिमाचल विकास काँग्रेस बनून राज्याच्या राजकारणात काहीशी खळबळ उडवून दिली होती. 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या नेत्यांनी बनलेल्या या पक्षाने 5 जागा जिंकून भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तरीदेखील हिमाचल विकास काँग्रेस देखील तिसऱ्या पर्यायाच्या स्लॉटमध्ये फिट होत नाही.

हिमाचलच्या जनतेचा फक्त दोन पक्षांवर विश्वास : काँग्रेस आणि भाजपने यावेळी हिमाचलमध्ये आम आदमी पक्षाला गांभीर्याने घेतले नाही कारण राज्यात त्यांची उपस्थिती नगण्य होती. अजूनतरी हिमाचलच्या जनतेने काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांवरच विश्वास ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच येथे पाच वर्षांपासून काँग्रेस आणि भाजप आळीपाळीने सरकार बनवत आहेत. यावेळीही तेच झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details