महाराष्ट्र

maharashtra

ब्रेकफास्ट, डिनरनंतर ही महिला खाते वाळू, समोर आले हे आयुर्वेदिक कारण

By

Published : Oct 23, 2021, 3:07 PM IST

लापूर येथील कटारी गावात कुसुमावती राहतात. 15 वर्षांच्या असल्यापासून त्यांना वाळू खायची सवज जडली. यावेळी त्यांना पोटदुखीने ग्रासले होते. अनेक उपाय करुन झाले तरी पोटदुखी कमी होत नव्हती. या दरम्यान एका आयुर्वेदिक डॉक्टरने त्यांना दुधात जरा वाळू टाकून खा, असा अजब सल्ला दिला होता. त्यांनी हा सल्ला ऐकला आणि आश्चर्य म्हणजे त्यांची पोटदुखी संपली. तेव्हापासून त्यांना ही अजब सवय जडली आहे.

कुसुमावती
कुसुमावती

वाराणसी (उत्तर प्रदेश) : कुसुमावती देवी या महिलेला वाळू खाण्याची सवय आहे. लहानपणापासून त्या वाळू खातात. वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांची ही सवय कायम आहे. नाश्ता झाला, जेवण झाले की जणू स्विट डिश म्हणून त्या वाळू खातात. 65 वर्षांपासून त्या वाळू खात आहेत. वाळू खाण्याचा त्यांच्या प्रकृतीवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही.

चोलापूर येथील कटारी गावात कुसुमावती राहतात. 15 वर्षांच्या असल्यापासून त्यांना वाळू खायची सवज जडली. यावेळी त्यांना पोटदुखीने ग्रासले होते. अनेक उपाय करुन झाले तरी पोटदुखी कमी होत नव्हती. या दरम्यान एका आयुर्वेदिक डॉक्टरने त्यांना दुधात जरा वाळू टाकून खा, असा अजब सल्ला दिला होता. त्यांनी हा सल्ला ऐकला आणि आश्चर्य म्हणजे त्यांची पोटदुखी संपली. तेव्हापासून त्यांना ही अजब सवय जडली आहे.

कुसुमावती यांची वाळू खाण्याची पद्धतही अनोखी आहे. आधी त्या वाळू पाण्याने स्वच्छ धुवून घेतात. त्यानंतर उन्हात वाळायला ठेवतात. वाळू स्वच्छ, कोरडी झाली की त्या खातात. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा त्यांना वाळू खाण्यापासून रोखले. पण त्यांची ही सवय काही सुटली नाही.

मात्र काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदात अशी कोणतीही उपचार पद्धती नाही असे स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी असे करु नये, असेही म्हणाले आहेत.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details