महाराष्ट्र

maharashtra

Ria Dabi UPSC Qualifies : 2015 बॅचची IAS टॉपर टीना डाबीची बहिण रिया डाबीचे UPSC परीक्षेत नेत्रदीपक यश

By

Published : Sep 25, 2021, 4:33 PM IST

Updated : Sep 25, 2021, 5:02 PM IST

-ria-dabi-qualifies-for-upsc-exam
-ria-dabi-qualifies-for-upsc-exam ()

2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी हिनेही मोठं यश मिळवले आहे. टीना डाबीने आपल्या बहिणीच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले आहे, की मला हे सांगताना आनंद होत आहे की, माझी छोटी बहीण रिया डाबीला यूपीएससी 2020 परीक्षेत 15 वी रँक मिळाली आहे.

नवी दिल्ली - सिव्हिल सेवा परीक्षा-2020 (Civil Services Exam-2020) चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. आयएएस टीना डाबी हिची छोटी बहीण रिया डाबीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. टॉपर टीना डाबीची बहीण रिया डाबीने सिविल सेवा परीक्षा 2020 मध्ये 15 वी रँक मिळवली आहे. सिव्हिल सेवा परीक्षा 2015 मध्ये पहिला रँक मिळवणाऱ्या टीना डाबीने आपल्या बहिणीच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले आहे, की मला हे सांगताना आनंद होत आहे की, माझी छोटी बहीण रिया डाबीला यूपीएससी 2020 परीक्षेत 15 वी रँक मिळवली आहे. टीन डाबी पहिली दलित आयएएस टॉपर होती.

वर्ष 2015 मध्ये सिव्हिल सेवा परीक्षेत टीना डाबी टॉपर होती. टीनाने वयाच्या केवळ 22 व्या वर्षी आयएएस परीक्षेत टॉप केले होते. आयएएस परीक्षेत टॉप केल्यानंतर ती संपूर्ण देशातील तरुणींसाठी रोल मॉडल ठरली होती. आता तिची छोटी बहीण देशातील मुलींची रोल मॉडल ठरली आहे.

आयएएस ट्रेनिंगनंतर टीना ला राजस्थान केडर मिळाले होते. वर्ष 2018 मध्ये टीनाने अतहर आमिर उल शफ़ी खान या आयएएस तरुणाशी विवाह केला होता. टीना टॉपर होती तर जम्मू काश्मीरचा रहिवाशी असलेल्या अतहरला याच परीक्षेत दुसरे स्थान मिळाले होते. अतहरलाही राजस्थान केडर मिळाले होते. मात्र दोघांनी दोन वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे.

फोटो सौजन्य- टीना डाबी इन्स्टाग्राम

IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहिणीच्या यशाबद्दल माहिती दिली. निकालानंतर रियाने आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच आईकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. आपल्या दोन्ही मुली IAS ऑफिसर व्हाव्यात अशी आईची खूप इच्छा होती. त्यामुळे आता ती खूप खूश असल्याचे सांगितले आहे. रियाने पहिल्या प्रयत्नात वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मोठं यश संपादन केले आहे. रियाने दिलेल्या माहितीनुसार, तिला पेंटिंगची आवड आहे. त्यामुळे स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी मी नेहमीच पेंटिंग करते. ज्यामुळे UPSC ची तयारी करताना खूप मदत झाली.

फोटो सौजन्य- टीना डाबी इन्स्टाग्राम

रियाने दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून 2019 मध्ये पॉलिटिकल सायन्सध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. रियाने आपली मोठी बहीण टीना नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असल्याचे म्हटले आहे.

Last Updated :Sep 25, 2021, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details