महाराष्ट्र

maharashtra

106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी केली 'या' नवीन संघटनेची घोषणा, कधी होणार शुभारंभ?

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 1:57 PM IST

106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 106 वा भाग आज प्रसारित करण्यात आला. यावेळी त्यांनी स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासह विविध विषयांवर मत व्यक्त केलं.

106th Episode of Mann Ki Baat
106th Episode of Mann Ki Baat

नवी दिल्ली 106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 106व्या मन की बात मध्ये भाषण केलं. यादरम्यान त्यांनी गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाल्याचं पतंप्रधानांनी सांगितलं. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील एका खादीच्या दुकानात एका दिवसात लोकांनी दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची खरेदी केली. या महिन्यात सुरुू असलेल्या खादी महोत्सवानं पुन्हा एकदा विक्रीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

व्होकल फॉर लोकल वर भर : पंतप्रधान मोदी म्हणाले की, दरवेळेप्रमाणे या वेळीही आपल्या सणांमध्ये आपलं प्राधान्य 'व्होकल फॉर लोकल' असलं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून ते स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. 'आत्मनिर्भर भारत' हे आमचे स्वप्न आहे. देशातील उत्पादनात आपल्या देशवासीयांच्या कष्टाचा सुगंध असेल. देशातील काही तरुणांची प्रतिभा असेल, माझ्या देशवासीयांना रोजगार मिळेल, अशा उत्पादनांनी घर उजळून टाकू, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. रोजच्या आयुष्यातही काही गरज असल्यास स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचं त्यांनी आवाहन केलंय.

आणखी एका नव्या संघटनेची घोषणा : 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी एका खूप मोठ्या देशव्यापी संघटनेची पायाभरणी होत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय. माय यंग इंडिया म्हणजेच MY Bharat असं या संघटनेच नाव असल्याचं मोदींनी सांगितलंय. याअंतर्गत भारतातील तरुणांना विविध राष्ट्र उभारणी कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देणार असल्याचं मोदी म्हणाले. याच्या वेबसाईटवर जाऊन तरुणांनी नोंदणी करावी असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय.

विरोधकांकडून टिकास्त्र : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापलंय. पंतप्रधान मोंदीनी यावर बोलावं, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसेलेल्या मनोज जरांगे पाटलांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शिर्डी इथं आल्यावरही मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी काहीच बोलले नाहीत. यामुळं त्यांच्यावर मराठा आंदोलकांकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ते आजच्या त्यांच्या मन की बात कार्यक्रमात बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र पंतप्रधान यावर काहीच बोलले नाहीत. तसंच माणिपूर मुद्द्यावरही त्यांनी काही न बोलल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut on PM Modi Shirdi visit: पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका, म्हणाले...
  2. Sharad Pawar befitted reply to PM Narendra Modi : शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना सडेतोड प्रत्युत्तर, कृषीमंत्री असताना शेतीक्षेत्रातील प्रगतीचा वाचला पाढा

ABOUT THE AUTHOR

...view details