ETV Bharat / state

बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिला, संभाजीराजेंनी मानले आभार - Lok Sabha elections

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 9:48 PM IST

Sambhajiraje Chhatrapati : लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. तसंच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा दाखवून दिल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं.

Former MP Sambhaji Raje
Former MP Sambhaji Raje

संभाजीराजेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर Sambhajiraje Chhatrapati : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. त्यावर माजी खासदार संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. राजर्षी शाहू मराहाज तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिला, समतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

श्रीमंत शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ऊस दर आंदोलनात आमच्यासोबत रस्त्यावर उतरून शाहू महाराजांनी योगदान दिलं. त्यामुळं त्यांच्याविरोधात कोल्हापूर लोकसभेत उमेदवार द्यायचा, की नाही यावर विचार करावा लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी श्रीमंत शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यामुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद शाहू महाराजांच्या उमेदवारीला बळ देणारी ठरणार आहे. यावरून स्वराज्य संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार संभाजीराजे यांनीही प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहेत.

जनतेचं ठरलंय, शाहू महाराजांना विजयी करायचं : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रचारासाठी मी राधानगरी सारख्या दुर्गम भागात लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. आता बदल हवा असून शिव-शाहुंच्या वारसदाराला लोकसभेत पाठवण्यासाठी लोक उत्सुक आहेत. शाहू महाराजांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण आहे. यापूर्वी लोकांची अनेक काम रेंगाळलीय. यामुळं शाहू महाराजांच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. यासाठीच राधानगरी-भुदरगड सारख्या दुर्गम भागात मी दौरा करत आहे. यावेळी अनेक लोकांनी शाहू महाराज दिल्लीत गेल्यासं आमचे प्रश्न सुटतील, असा आशावाद व्यक्त केल्याचं संभाजीराजांनी सांगितलं. आता ही निवडणूक जनतेनं हातात घेतल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

हे वचालंत का :

  1. लोकसभा निवडणूक 2024 : 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला याची उत्सुकता... - Thane Lok Sabha Constituency
  2. कल्याणचा सुभेदार कोण? मुख्यमंत्री शिंदे पुत्र की दिवंगत आनंद दिघेंचा पुतण्या? - Kedar Dighe VS Shrikant Shinde
  3. "केजरीवाल जेलमध्ये गेले आणि संजय राऊत...", केजरीवालांचं उदाहरण देत किरीट सोमैयांचा राऊतांवर निशाणा - Kirit Somaiya News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.