ETV Bharat / state

Major Vasant Jadhav : कुणी मेडल देतं का मेडल! हजारोंचे प्राण वाचविणारा 31 वर्षे उपेक्षित, निवृत्त मेजरची सरकारकडं आर्तहाक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 9:37 PM IST

Updated : Mar 11, 2024, 10:17 PM IST

Major Vasant Jadhav Hunger Strike : 12 मार्च 1993 ला झालेल्या बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई हादरली. त्यापाठोपाठ 14 मार्च रोजी दादर नायगाव येथील 12 किलो वजनाचा आरडीएक्स, तसंच स्कूटरमध्ये ठेवलेला टाईमबॉम्ब निकामी करून शेकडो जणांचे प्राण वाचविणारे निवृत्त मेजर वसंत जाधव आजही पुरस्कारापासून वंचित आहेत.

Retired Major Vasant Jadhav announce Hunger Strike for medal on March 14 in Mumbai
निवृत्त मेजर वसंत जाधव यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला

निवृत्त मेजर वसंत जाधव यांनी

मुंबई Major Vasant Jadhav Hunger Strike : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात (Mumbai Bomb Blast) दादरचा बॉम्ब निकामी करणारे निवृत्त मेजर वसंत जाधव अद्यापही केंद्र आणि राज्य सरकारपासून दुर्लक्षित आहेत. त्यावेळी स्कूटरमध्ये ठेवलेला 12 किलो आरडीएक्सचा बॉम्ब निकामी करून त्यांनी दादरमधील हजारो जीव वाचवले होते. मात्र, त्यांच्या शिफारशीवरून सहा अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देणाऱ्या सरकारनं त्यांनाच उपेक्षित ठेवलंय. तसंच पत्रव्यवहार करूनदेखील प्रशासन दखल घेत नसल्यानं वसंत जाधव यांनी आता दादर परिसरातच उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे.

336 हून अधिक वेळा पत्रव्यवहार : निवृत्त मेजर वसंत जाधव यांनी आजपर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, नागरी हवाई वाहतूकमंत्री, सार्वजनिक तक्रार निवारणमंत्री आणि डीजी बीसीएएस यांना 336 हून अधिक पत्रं लिहून आपल्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याची विनंती केली. मात्र, अद्यापही यावर त्यांना उत्तर मिळालेलं नाही. याप्रकरणी ईटीव्ही भारतशी संवाद साधत असताना वसंत जाधव यांनी आपली खंत बोलून दाखवली. तसंच 31 वर्षानंतर ज्या ठिकाणी नायगाव क्रॉस रोड येथे टाईम बॉम्ब निष्क्रिय त्याच ठिकाणी ते येत्या 14 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.



अनेकांचे जीव वाचवले : वसंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 मध्ये भारत सरकारच्या ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (Bureau of Civil Aviation Security) यांच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई विमानतळ येथे सुरक्षेबाबत तसंच बॉम्बस्फोटचा प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याआधी ते सैन्यात मेजर म्हणून काम करत होते. 14 मार्च 1993 ला दादर नायगाव क्रॉस रोड येथे वसंत जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सहकार्य केले आणि अनेकांचे जीव वाचवले. 12 किलो वजनाचा आरडीएक्स आणि स्कूटरमध्ये लपवून ठेवलेला टाईम बॉम्ब मेजर वसंत जाधव यांनी निकामी करून नेहमी वर्दळ असलेल्या दादर येथील हजारो जीव वाचवले होते.

हेही वाचा -

  1. Battalion 50 : 'बटालियन 50'मधून दिसणार सीमेवरील शूरवीरांची गाथा; लवकरच मोठ्या पडद्यावर होणार प्रदर्शित....
  2. 'सशस्त्र सेना माजी सैनिक दिन', काय आहे या दिवसाचं महत्त्व, वाचा सविस्तर
  3. माजी सैनिकाकडून विश्वचषकासाठी भारतीय संघाला शुभेच्छा अन् जोरदार घोषणाबाजी; पाहा व्हिडिओ
Last Updated : Mar 11, 2024, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.