ETV Bharat / state

पुणे पोलिसांचा नादच खुळा; दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 10:02 AM IST

Updated : Feb 21, 2024, 1:01 PM IST

Pune Police Drug Seized in Delhi : पुणे पोलिसांचा नादच खुळा असं म्हणायची वेळ आता आलीय. पुणे पोलिसांनी थेट राजधानी दिल्लीत ड्रग्जबाबत मोठी कारवाई केलीय. त्यामुळं पुणे पोलिसांचं कौतुक केलं जातंय.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे Pune Police Drug Seized in Delhi : मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात ड्रग्जविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचं हजारो किलो ड्रग्ज जप्त (Pune Police Drug Action) केलं होतं. यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट नवी दिल्लीत कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं तब्बल 600 किलो ड्रग्ज जप्त केलंय. गेल्या तीन दिवसांत तब्बल 4 हजार कोटींचं 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय.

ड्रग्ज पेडलरचे धाबे दणाणले : पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी (20 फेब्रुवारी) पुण्यातील विश्रांतवाडी आणि कुरकुंभ भागात 1100 कोटी किंमतीचं एकूण 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. यात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पुणे पोलीस पथकानं देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात मोठी कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.

पुणे पोलिसांची दिल्लीत कारवाई : ड्रग्ज मुक्त मोहीम : पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच 'ड्रग्ज मुक्त पुणे' ही मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पुण्यात मंगळवारी कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दिल्लीत आणखी एक कारवाई करण्यात आलीय. दिल्लीत 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. याची किंमत 1200 कोटी रुपये इतकी आहे. पुणे पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय. गेल्या तीन दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.

तीन दिवसात 4 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त : पुणे पेलिसांनी 18 फेब्रुवारी रोजी सोमवार पेठेत छापेमारीत 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. याप्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक तपास केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी नवी दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.

दिल्लीतही पथकाची कारवाई : या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त यांनी दिल्लीसह अनेक राज्यात पुणे पोलिसांचं पथक पाठवलं होतं. 20 आणि 21 फेब्रुवारीला पुणे पोलिसांकडून दिल्लीत कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं 600 किलो एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलंय. एकूणच गेल्या 3 दिवसांत पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जवळपास 4 हजार कोटी रुपयांचं 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा 'तो' मास्टरमाईंड कोण? याचा शोध पुणे पोलीस करत आहेत. 'सॅम ब्राऊन' नावाच्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलीस आत्ता शोध घेत आहेत. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात जे ३ आरोपी अटक आहेत, त्यांना ३ महिन्यात २ हजार किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिलं होतं, अशी चर्चा आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी ५ जणांना अटक केलीय. युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केलीय.

कुरकुंभ येथे होता कारखाना : सगळ्या ड्रग्ज प्रकरणात सॅम ब्राऊन नावाच्या या परदेशी मास्टरमाईंडनं आरोपी युवराज भुजबळ याला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता. त्यानुसार भुजबळ हा एमडी बनवत होता. भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे एमडीचा कारखाना सुरू केला होता. त्यांनी ३ महिन्यात २ हजार किलो एमडी देखील बनवला असल्याची चर्चा आहे. आत्ता या सगळ्या प्रकरणाचा आणि याच्या मास्टरमाईंडचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

  1. अमली पदार्थांच्या तस्करीत पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई, 1100 कोटींचे 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त
  2. पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 100 कोटींचं ड्रग्ज जप्त, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड
Last Updated : Feb 21, 2024, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.